जिल्हा प्रतिनिधी, ;- मंठा (जालना)
मेहसूल विभागाकडून २०२२ पासून केवळ आश्वासनेच मिळत असून प्रत्यक्ष न्याय मिळत नसल्याच्या निषेधार्थ गेवराई येथील शेतकरी नायबराव साहेबराव गोंडगे (वय ५२) यांनी आज संतापाच्या भरात स्वतःला शेतजमिनीत गाडून घेत अनोखे आंदोलन केले. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
प्रकरणाचे तपशील
नायबराव गोंडगे यांच्या वडिलोपार्जित शेतजमिनीचे सर्वे नं. 18, गट क्रमांक 61, 62 आणि 63 आहेत. कुटुंबातील एका भोळसट सदस्याच्या निष्काळजीपणाचा फायदा घेत काही व्यक्तींनी कार्यालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांना आमिष दाखवून संगनमताने गंमत-जंमत करून शेतजमीन लाटल्याचा आरोप गोंडगे यांनी केला आहे.
या प्रकरणात अनेक वेळा पाठपुरावा करूनही योग्य नोंदी दुरुस्त न झाल्याने, आणि वर्षानुवर्षे चाललेल्या आश्वासनांमुळे शेतकरी अखेर संतापाच्या भरात आंदोलनास उतरले.
तहसीलदारांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे
घटनास्थळी तहसीलदार सुमन मोरे, नायब तहसीलदार कल्याण काळदाते, मंडळ अधिकारी भगवान देशमुख, तसेच मंठा पोलिस ठाण्याचे सुक्रे साहेब, सुनील होडे आणि बालाजी बेले पोहोचले.
तहसीलदार सुमन मोरे यांनी तातडीने कार्यवाही करून न्याय मिळवून देण्याचे तोंडी आश्वासन दिल्याने नायबराव गोंडगे यांनी आपले आंदोलन मागे घेतले.
मोठी ग्रामस्थांची उपस्थिती
या वेळी कैलास बापू बोराडे, उदयादादा बोराडे, माऊली घोंगडे, बाबा गोंडगे, अंकुश देशमाने, योगेश अवचार, पप्पू बोराडे, दत्ता खरात, रमेश राठोड यांच्यासह गेवराई येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
शेतजमिनीच्या प्रकरणात न्याय न मिळाल्याने शेतकऱ्यांचा संताप जमिनीत स्वतःला गाडून आंदोलन
0
8
9
4
5
2
Users Today : 18
Leave a comment