मेहकर प्रतिनिधी ;-
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची मेहकर तालुक्यातील विस्तारित जंबो कार्यकारिणी दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ रोजी भव्य कार्यक्रमात जाहीर करण्यात आली. मेहकर-लोणार विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही कार्यकारिणी घोषित झाली.
कार्यक्रमास उपजिल्हा प्रमुख प्रा. आशिष रहाटे, तालुका प्रमुख निंबाजी पांडव, युवा सेना तालुका अधिकारी अॅड. आकाश घोडे, मेहकर शहर प्रमुख किशोर गारोळे, तसेच महिला आघाडी लोणार तालुका अध्यक्षा तारामती जायभाये प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रम मेहकर येथील जनसंवाद कार्यालयात संपन्न झाला.
नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
या प्रसंगी नव्याने निवडण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना
नियुक्तीपत्र प्रदान करून,
पक्षाचे मशाल चिन्ह असलेले रुमाल गळ्यात घालून आदरपूर्वक पक्षात स्वागत करण्यात आले.
आगामी निवडणुकांसाठी आवाहन
आमदार सिद्धार्थ खरात यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले की—
“आगामी निवडणुकांमध्ये पक्षाचे सर्व उमेदवार एकजुटीने, निष्ठेने आणि पूर्ण ताकदीने विजयी करण्यासाठी सज्ज व्हा.”
कार्यक्रमादरम्यान पदाधिकाऱ्यांमध्ये नवीन ऊर्जा आणि उत्साह दिसून आला.
मेहकर तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)ची विस्तारित जंबो कार्यकारिणी जाहीर
0
8
9
4
5
2
Users Today : 18
Leave a comment