तेवीस वर्षे अविरत देश सेवा देणाऱ्या जवानाचे पातुर वासियांनी केले जल्लोषात स्वागत

Khozmaster
4 Min Read

प्रतिनिधी रामेश्वर वाढी देश सेवा करण्याकरिता अनेक युवकांची मोठ्या प्रमाणात होड लागते परंतु काही युवक या मध्ये सफल होतात तर काहींच्या हातात निराशा येते परंतु जिद्द व चिकाटीने प्रयत्न करणे आवश्यक असते असे मत नुकतेच देश सेवेतून सेवानिवृत्त मेजर संजय निमकंडे यांनी व्यक्त केले त्यांनी उपस्थित तरुण युवकांना आपल्या 23 वर्षातील देश सेवेतील अनुभव साजेशे केले त्यांच्या सत्कार व शोभायात्रा स्वागत समारंभात पातुर शहरातील विविध क्षेत्रातील नागरिकांनी सर्वधर्मसमभावाचा परिचय देत हिंदू ,मुस्लिम,बौद्ध धर्माच्या अशा अनेक संघटनांनी सेवानिवृत्त संजय निमकंडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला मेजर संजय निमकंडे 2 तारखेला आपल्या परिवारासह अकोला येथील रेल्वे स्टेशनवर आले असता पातुरकरांनी रेल्वे स्टेशन ते पातुर शहर सत्कारांचा वर्षाव करून शुभेच्छा दिल्या सर्वप्रथम निवृत्त मेजर संजय निमकंडे यांनी शिलाऀ येथील शहीद कैलास निमकंडे यांच्या स्मारकाला भेट देवून त्यांना मानवंदना दिली.शोभायात्रे वेळी शहिद आनंदा काळपांडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला,मिलींद नगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली तसेच येथील स्मारकास मानवंदना दिली यावेळी शहीद कैलास निमकंडे यांचे वीरपिता व वीरमातेने त्यांचा फुलगुच्छाने स्वागत केले शिरला येथील सोमपुरी ज्येष्ठ नागरिक संघाने सुद्धा संजय निमकंडे यांचे मोठ्या संख्येने स्वागत केले. पातुर शहरातून नवीन बस स्टॅण्ड ते सिदाजी महाराज मंदिरापर्यंत निवृत्त मेजर संजय निमकंडे यांच्या स्वागतामध्ये अनेक नागरिकांनी फुलांचा वर्षाव करत संजय निमंकंडे यांना शुभेच्छा दिल्या पातुर तालुका माजी सैनिक संघटनेच्या वतीने मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.  निवृत्त मेजर यांनी संभाजी चौकातील महात्मा ज्योतिबा फुले यांना ही पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.    निवृत्त मेजर संजय निमकंडे यांच्या आई ह्या आपल्या पुत्राला डोळ्यासमोर पाहून भाऊक झाल्या तर त्यांचे सुद्धा स्वागत उपस्थित मान्यवरांनी केले अशाप्रकारे देशसेवेचे अनमोल कर्तव्य निभावलेल्या सैनिकाला बहुमान देऊन पातुर शहरातील नागरिकांनी एक आदर्श सैनिकांच्या मनामध्ये उभारला  स्वागत समारंभ कार्यक्रमात शिर्ला ग्रामपंचायत सदस्य सागर कढोणे,पातूर पंचायत समिती माजी सभापती बालू बगाडे, पातूर नगरपरिषद माजी उपाध्यक्ष राजू उगले,माजी नगरसेवक पै.भोजराजसिंह बायस,माजी नगरसेवक शंकरराव बोचरे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष डॉ.ओमप्रकाश धर्माळ, होमगार्ड माजी समुपदेशक रूस्तम गवई, शिवसेना शहर उपाध्यक्ष शंकर देशमुख,शहिद कैलास निमकंडे स्मारक समितीचे अध्यक्ष वीर पिता काशिराम निमकंडे,पातुर तालुका माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष निवृत्त सैनिक तुकाराम निलखन,उपाध्यक्ष निवृत्त सैनिक बंडूभाऊ निमकंडे, सचिव निवृत्त सैनिक प्रशांत निलखन,सह अनेक माजी सैनिक,देशसेवेचे कर्तव्य बजावत असलेले एनडीआरएफचे जवान रवी हिरळकार,मेजर रशीद,संत श्री सिदाजी महाराज पंच कमिटीचे महादेव गणेशे, प्रसिद्ध संगिताचार्य प्रा.विलास राऊत सर,काळपांडे सर, गणेश गाडगे,सोमपुरी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष नारायण अंधारे,पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष देवानंद गहिले,श्री सिदाजी व्यायाम शाळेचे अध्यक्ष पै.मगेश गाडगे,माळी युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बारताशे,सचिव जीवन ढोणे,शहराध्यक्ष डिगांबर फुलारी, महात्मा ज्योतिबा फुले स्मारक समितीचे अध्यक्ष सुरेंद्र उगले,मोहन गाडगे,अभ्युदय फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे,पातुर तालुका विकास मंचाचे किरण कुमार निमकंडे,विजय राऊत डॉ विलास हिरळकार,मधूकर राखोंडे, विठ्ठल डिके, प्रल्हाद गवई, नासिर खान,प्रा.शंकर गाडगे, सुहास देवकर,महेश बोचरे,लोकसेवाचे व्यवस्थापक प्रकाश निमकंडे,जेष्ठ कवी निलखन सर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.  शोभायात्रेत प्रल्हाद गवई यांनी उत्कृष्ट अशी देशभक्ती वरील गिते गावून उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पातूर तालुका विकास मंच चे ठाकूर शिवकुमार बायस यांनी केले तर आभार प्रदर्शन रूस्तम गवई यांनी मानले.  या यशस्वी कार्यक्रमाचे आयोजन निवृत्त मेजर संजय निमकंडे यांचे मोठे बंधू राजेश निमकंडे, संतोष निमकंडे,विजय निमकंडे व त्यांचा मित्र परिवार यांनी केले.

 

0 9 4 7 5 0
Users Today : 39
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *