दुसरबीड, दि. २७ (प्रतिनिधी):
महिला या समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीचा कणा असून त्यांच्या शिक्षण, स्वावलंबन आणि सक्षमीकरणासाठी सातत्याने प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन धनश्री कायदे यांनी केले.
उमेद अभियानांतर्गत सोनोशी येथे आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिलांच्या सहभागामुळे कार्यक्रम आनंददायी व उत्साही वातावरणात पार पडला.
कार्यक्रमात महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी स्वयंरोजगार, बचतगट, प्रशिक्षण उपक्रम यांचे महत्त्व विशद करण्यात आले.
हळदी-कुंकू समारंभात महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेत सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवले. महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवणे, एकमेकांना प्रेरणा देणे आणि सामाजिक बांधिलकी जपणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपस्थित मान्यवर व आयोजकांचे विशेष योगदान लाभले. शेवटी उपस्थित महिलांनी समाधान व्यक्त करत अशा उपक्रमांचे सातत्य राखावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
Users Today : 6