शेंदुर्जन प्रतिनिधी :
लोकनेते अजितदादा पवार यांचे दुर्दैवी निधन संपूर्ण महाराष्ट्राला खळबळीत केले असून, आज त्याचे पडसाद शेंदुर्जन येथेही उमटले.
ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांच्या वतीने संपूर्ण गावात कडकडीत बंद पाळून अजितदादांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपस्थित नेते व अधिकाऱ्यांनी आपली भावना व्यक्त करताना म्हटले की, हे महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील एक मोठे नुकसान आहे.
कार्यक्रमात ग्रामविकास अधिकारी प्रकाश आढाव, दिनकरराव देशमुख, नकुल शिंगणे, अमोल शिंगणे, सुधाकरराव शिंगणे, शंकर उगलमुगले, खुशालराव शिंगणे, रामराव वायाळ, विठोबा शिंगणे, पी. व्ही. शिंगणे, विठोबा खरात, सुशील शीलवंत, दीपक काळे, गजानन मोरे, मारुती शिंगणे, संदीप नालेगावकर, घनश्याम सरडे, भगवान जाधव, महेश शिंगणे, सचिन टेके, तुकाराम शिंगणे, गजू मुंडे, दिनकर शिंगणे, शिवाजी शिरसाट, राजू शिंदे, विष्णू डवके, राजू चव्हाण यांसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावभर शोककळा आणि भावनिक वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.
शेंदुर्जन : लोकनेते अजितदादांच्या निधनामुळे गावभर शोककळा
0
9
4
9
7
6
Users Today : 7
Leave a comment