देऊळगाव राजा प्रतिनिधी :
उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाल्यानंतर त्यांच्या आठवणींना उजाळा देताना डॉ. राजेंद्र शिंगणे भावूक झाले.
शिंगणे म्हणाले, “प्रशासनावर वचक असणारा नेता महाराष्ट्रात आजपर्यंत झाला नाही. अजित दादांच्या जाण्याने जी हानी झाली आहे, ती कधीही भरून निघू शकणार नाही. दादांसारखे नेतृत्व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले, सर्व जाती-धर्माची माहिती असलेले एकमेव नेता होते.”
१९९३-९४ मध्ये शिंगणे आणि अजितदादा पवार यांनी सहकार क्षेत्रातून राजकीय क्षेत्रात प्रवेश केला होता. राज्य सहकारी बँकेची अध्यक्षपदाची धुरा अजितदादांनी सांभाळली. शिंगणे यांनी सांगितले की, वक्तशीर, स्पष्ट भूमिकेचा आणि मनातील जे ते ओठावर सांगणारा नेता म्हणजे अजितदादा होते.
त्यांच्या नेतृत्वाखाली सिंदखेड राजा मतदारसंघात आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे मार्गी लागली, तसेच हरित क्रांतीसाठी खडकपूर्णा प्रकल्पाला निधीदेखील त्यांच्या पुढाकारामुळे मोठ्या प्रमाणात मिळाले.
शिंगणे यांचा कंठ भावनांनी दाटून आला आणि अनेक वेळा अश्रू अनावर झाले.
अजितदादांच्या आठवणीत डॉ. राजेंद्र शिंगणेंना अश्रू अनावर
0
9
4
9
7
5
Users Today : 6
Leave a comment