कृष्णराव रामजी पाटील विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्सव

Khozmaster
1 Min Read

खामगाव प्रतिनिधी :
कृष्णराव रामजी पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, (बोरी आडगाव) येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला.
प्रभातफेरीने कार्यक्रमाची सुरुवात झाली, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. विद्यालय संस्थापक कृष्णराव रामजी पाटील यांचे स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेसही अभिवादन करण्यात आले.
भारतीय सैन्यदलातील सैनिक रुपेश सुरवाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. राष्ट्रध्वजाला मानवंदना देताना विद्यार्थ्यांनी कवायती सादरीकरण करून उपस्थितांची मनं जिंकली.
विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त अभियान, बालविवाहमुक्त भारत, तसेच कुष्ठरोग जनजागृती शपथ घेत सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला. ‘मी संविधान बोलतोय’ या निबंध स्पर्धेत विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस प्रदान करण्यात आले. नागरिकांचे हक्क व कर्तव्य यावर प्रश्नमंजुषा घेण्यात आली, तर क्रीडा स्पर्धांतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
सांस्कृतिक कार्यक्रमांत देशभक्तीपर गीते, नाटिका व विविध सादरीकरणांनी उपस्थितांची मनं जिंकली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संतोष रिंढे यांचे, तर प्रमुख उपस्थितीत संस्थाध्यक्ष राजेश पाटील, सदस्य श्रीधर पाटील, सरपंच विद्याताई पाटील, तेजराव पाटील, सचिन बोहरपी, निरंजन सुरवाडे, गजानन सुरवाडे उपस्थित होते.
प्रास्ताविक प्रा. मीना झटाले, सूत्रसंचालन जिया सुरवाडे व ऋतुजा टिकार, आभार अश्विनी मांजुळकर यांनी मानले. रिंढे यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्व व कर्तव्य समजावले, तर मुख्याध्यापकांनी शाळेस पुस्तक भेट देऊन वाचन संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित केले.

0 9 4 9 7 5
Users Today : 6
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *