साखरखेर्डा: शासकीय व निमशासकीय कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्सव

Khozmaster
2 Min Read

साखरखेर्डा प्रतिनिधी : येथील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विविध ठिकाणी झेंडावंदन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी साखरखेर्डा नगरी विद्यार्थ्यांनी दिलेल्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले.
प्रारंभी सकाळी सात वाजता साखरखेर्डा पोलीस स्टेशन येथे ठाणेदार गजानन करेवाड यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक विद्यालय, खाजगी शाळा, सर्व बँका, महसूल अधिकारी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय येथे झेंडावंदन पार पडले.
प्रभातफेरीत सहभागी झालेल्या शाळांमध्ये:
जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा (मुले व मुली)
जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक उर्दू शाळा
एसईएस हायस्कूल व ज्युनियर कॉलेज
शिवाजी हायस्कूल
जिजामाता विद्यालय
सहकार विद्या मंदिर
अनिकेत सैनिक स्कूल
सांस्कृतिक कार्यक्रम:
जिजामाता विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासत कला सादर केली.
एसईएस हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे माहिती सादर केली.
शिवाजी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनीही सांस्कृतिक सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली.
झेंडावंदन प्रमुख उपस्थिती:
ग्रामपंचायत कार्यालय: माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राम जाधव
शिवाजी हायस्कूल: संस्थेचे अध्यक्ष डॉ. निलम महाजन
एसईएस हायस्कूल: सचिव चंद्रशेखर शुक्ल
जिजामाता विद्यालय: सचिव पंजाबराव हाडे
महसूल अधिकारी कार्यालय: महसूल अधिकारी प्रशांत पोंधे
भारतीय स्टेट बँक शाखा अधिकारी: सचिन खेडकर
बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक शाखा अधिकारी: शेजूळ
प्राथमिक आरोग्य केंद्र: डॉ. गोपाल परिहार
यावेळी सरपंच ज्योती अमित जाधव, संतोष मोरे, ललित अग्रवाल, दिलीप बेंडमाळी, सय्यद रफीक, शेख आयुब कुरेशी, शिक्षक व गावकरी उपस्थित होते.

0 9 4 9 7 5
Users Today : 6
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *