डोणगाव प्रतिनिधी : राज्यातील आदिवासी आश्रम शाळांमध्ये फेब्रुवारीपासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार आधार-बेस हजेरीशिवाय निघणार नाही, असा आदेश आदिवासी विकास आयुक्तालय, नाशिक यांनी जारी केला आहे. यामुळे आता शाळेवर कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष हजेरी लावावी लागणार आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वी अनेक कर्मचाऱ्यांनी शाळेवर न येता पगार घेतला, संस्था चालकांच्या मर्जीने किंवा घरच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून हजेरी नोंदवली. काही ठिकाणी हिस्सा देऊन नोकरी टिकवणारे कर्मचारी देखील होते. आता फेब्रुवारीपासून फेस रिडिंगद्वारे आधार-बेस प्रणाली लागू झाल्याने, सर्व कर्मचाऱ्यांना शाळेत येऊन प्रत्यक्ष हजेरी नोंदवावी लागणार आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये धास्तवळ निर्माण झाली आहे.
राज्यभरातील स्थिती:
शासकीय आदिवासी आश्रम शाळा: ५२५
अनुदानित आदिवासी आश्रम शाळा: ५५४
अनुदानित शाळांवरील कर्मचाऱ्यांची संख्या: ४५०
अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ८ शासकीय व २१ अनुदानित शाळा, कर्मचारी संख्या ६७०
शासकीय शाळांमध्ये जून २०२५ पासून आधार-बेस फेस रिडींग सुरू आहे. आता अनुदानित शाळांवरील कर्मचाऱ्यांनाही फेस रिडींगद्वारे हजेरी नोंदवावी लागणार आहे, असे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी (अकोला) मोहन व्यवहारे यांनी सांगितले. सध्या मॅपिंगचे काम सुरू असून, लवकरच पूर्ण झाल्यावर सर्व कर्मचाऱ्यांची हजेरी फेस रिडींगद्वारे होणार आहे.
आदिवासी आश्रम शाळांतील कर्मचाऱ्यांना आधार-बेस हजेरी अनिवार्य
0
9
4
9
7
5
Users Today : 6
Leave a comment