दुसरबीड प्रतिनिधी : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त किनगाव जट्टू गावात विशेष मतदार जागृती उपक्रम राबविण्यात आला. लोकशाही प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढावा, या उद्देशाने ग्रामविकास अधिकारी विनोद सातपुते यांच्या पुढाकारातून हा उपक्रम यशस्वी झाला.
या मोहिमेत विशेष स्टिकर्स तयार करून गावातील विविध सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आले. स्टिकर्सवर प्रभावी घोषवाक्ये व प्रेरणादायी संदेश होते, जसे की:
“वृद्ध असो, जवान असो, अवश्य करा मतदान”
“मतदार राजा, जागा हो”
“लोकशाहीचा धागा हो”
“जागरूक मतदार, लोकशाहीचा आधार”
“चला मतदान करू, जनहिताचे शासन आणू”
यावेळी उपस्थित नागरिकांना मतदानाचे ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्व समजावून सांगितले गेले. प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाला सुधाकर काळबांडे, राजेश नागरे, सुखदेव माळोदे, सुभाष काळबांडे, जितेंद्र मुळे, गौरव राऊत, कांता मिसाळ यांच्यासह अनेक नागरिकांनी सहभाग घेतला. या मोहिमेमुळे गावात मतदानाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये उत्साहाचे चित्र दिसून आले.
किनगाव जट्टूमध्ये स्टिकर मोहिमेद्वारे मतदार जागृती
0
9
4
9
7
6
Users Today : 7
Leave a comment