उमदा नेता महाराष्ट्राने गमावला : ना. प्रतापराव जाधव

Khozmaster
1 Min Read

बुलढाणा प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी मन सुन्न करणारी आहे. क्षणात सर्व काही शांत झाल्यासारखे वाटतेय. ज्यांच्या उपस्थितीने आशा मिळत होती, ते आज केवळ आठवणीत उरले आहेत. त्यांचे विचार, कार्य आणि त्यांच्या आठवणी कधीही काळाच्या पडद्याआड जाणार नाहीत, अशी शोक भावना केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केली.
अजित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी झेप घेतली. अजित पवार हे पवार साहेबांच्या मुशीत तयार झालेले नेते असले, तरी त्यांनी नंतर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. ही ओळख
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ठसवली.
प्रशासनावर अचूक पकड आणि एखाद्या फाईलीचा गुंता सोडवताना त्याची गाठ नक्की कुठून सोडवायची याचे अचूक ज्ञान असलेला हा नेता होता. प्रशासन हे सत्ताधाऱ्यांपेक्षा वरचढ होण्याच्या काळात असा नेता महाराष्ट्राने गमावणे हे अतिशय दुर्दैवी आहे. अजित पवार हे स्पष्टवक्ते होते. काम होणार नसेल तर ते तोंडावर सांगायचे आणि होणार असेल तर त्यासाठी ते सगळी शक्ती लावायचे. राजकारणातील दिलदार उमदा नेता महाराष्ट्राच्या राजकारणाने गमावला, अशी प्रतिक्रिया ना. जाधव यांनी व्यक्त केली.

0 9 4 9 7 4
Users Today : 5
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *