खामगाव प्रतिनिधी : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुः खद निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक असून राज्याच्या राजकारणात न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. स्पष्ट वक्तेपणा विकासात्मक दृष्टीकोन आणि सर्वसामान्य कार्यकत्यांशी थेट नातं जपणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक निर्णयांनी राज्याच्या प्रगतीला दिशा दिली. त्यांच्या अकस्मात जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. श्रद्धांजली अर्पण करण्याचे धाडसही सध्या नाही आहे दादांबद्दल जेवढे बोलायचे तेवढे कमीच आहे. निशब्द श्रद्धांजली
– भूषण दाभाडे पाटील,शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
राज्याच्या राजकारणात न भरून निघणारी पोकळी
0
9
4
9
7
4
Users Today : 5
Leave a comment