मेहकर प्रतिनिधी :
स्थानिक क्रीडा संकुल मैदानात प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यादरम्यान घेण्यात आलेल्या नृत्यस्पर्धेत महेश इंटरनॅशनल स्कूल, मेहकर या शाळेच्या गटाने उत्कृष्ट सादरीकरण करत तृतीय क्रमांक पटकावला.
या स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी “विविधतेत एकता” हा संदेश प्रभावीपणे मांडत महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, पश्चिम बंगाल व तामिळनाडू या राज्यांच्या लोकनृत्यांचे सुंदर सादरीकरण केले. या नृत्यप्रकारांमध्ये तब्बल १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल शाळेला सन्मानचिन्ह व रोख १,००० रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.
मार्गदर्शन व सहकार्य
या विद्यार्थ्यांना
दुर्गा वडुळकर, शुभदा बुगदाणे, अश्विनी मोर्शीकर, वर्षा मूलचंदानी, तरुण शर्मा, शिवम हुंबाड, गजानन निकम, मनीष इंगळे, अनघा धोंगडे, खोटे मॅडम, पुनम शर्मा, पूजा काळे, नेहा चरखा, वैष्णवी धांडे
यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व अभि बोरे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
संस्थेचे अभिनंदन
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष लोहिया, सचिव गोपाल मोदाणी, कोषाध्यक्ष उदय सोनी, प्राचार्य ज्योती मंत्री आणि उपप्राचार्य काशिनाथ गायकवाड यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शकांचे अभिनंदन करत, भविष्यातही असेच उत्कृष्ट व प्रेरणादायी उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली
प्रजासत्ताक दिनी नृत्य स्पर्धेत महेश इंटरनॅशनल स्कूलचा तृतीय क्रमांक
0
9
4
9
7
4
Users Today : 5
Leave a comment