महाराष्ट्राच्या राजकीय आकाशातून एक तेजस्वी तारा मावळला – अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Khozmaster
1 Min Read

बारामती प्रतिनिधी :

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर कालचा दिवस काळा दिवस म्हणून लक्षात राहील. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित दादा पवार यांचा अचानक मृत्यू ने राज्यातील सर्व राजकारणकारांना आणि जनतेला शोकाकुल केले. सकाळी ८.४८ वाजता संपन्न झालेली दादांची यात्रा, त्यांच्या नेतृत्वाची घोडदौड आणि तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचा अचूक ठसा अचानक थांबला.
एकेकाळी महाराष्ट्रभर आपली छाप सोडणारा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात महत्त्वाची भूमिका बजावणारा हा नेता, शरद पवार साहेबांच्या कृपाशिर्वादाने राजकारणातील स्वतःची ओळख घट्ट निर्माण केली, तरीही तो कोणावरही पलटवार करणारा नव्हता. शाहू-फुले-आंबेडकर यांचा आदर त्यांच्या प्रत्येक भाषणात दिसून येत असे, त्यामुळेच हृदयात सर्वसमावेशकतेसाठी विशेष स्थान निर्माण झाले होते.
व्यक्तिशः त्यांच्या जवळ नसले तरीही, अनेकवेळा दादांशी संपर्क झाला. डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनात त्यांनी उत्सुकतेने संवाद साधला आणि आपली माहिती विचारली होती. त्यांच्या अंत्यविधीवेळी बारामतीत उपस्थित राहून शोकसागरात सहभागी होणे, हा प्रत्येकासाठी भावनिक अनुभव ठरला.
राजकारणातील धारदार आणि खडतर आवाज थांबला; उपमुख्यमंत्री पदासारखे संपत्ती, प्रतिष्ठा आणि अधिकार सोडून दादा अनंताच्या प्रवासाला निघाले. लाखो जनतेच्या अश्रूंच्या ढगात, भावनिक श्रद्धांजली अर्पण करताना, महाराष्ट्राने आपल्या नेता हरवला.
अजित दादा पवार यांना पुनश्च हृदयपूर्वक श्रद्धांजली!

0 9 4 9 7 4
Users Today : 5
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *