गुरू रविदास जयंतीनिमित्त बुलढाण्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

Khozmaster
2 Min Read

बुलढाणा प्रतिनिधी :

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने बुलढाणा येथे जगतगुरु संतशिरोमणी गुरू रविदास महाराज जयंतीनिमित्त शनिवार, दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता धाड नाका येथील गुरू रविदास महाराज मंदिरात महाराजांच्या मूर्तीचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून होणार आहे. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात येणार असून ही रॅली धाड नाक्यापासून सुरू होऊन शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करीत रविदास महाराज स्मारक, संगम चौक येथे विसर्जित होणार आहे.
यानंतर सकाळी १० वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून ती संगम चौक येथून सुरू होऊन गुरू रविदास सामाजिक भवन, मच्छी ले-आऊट, तानाजी नगर येथे समारोप होणार आहे.
दुपारी १२ वाजता गुरू रविदास महाराज जयंती सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्षा पूजाताई गायकवाड यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते आत्माराम चांदोरे असतील.
प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुकेश झंवर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंद राजूसकर, डॉ. दीपक काटकर, अ‍ॅड. राजेश खुर्दे, ज्येष्ठ सत्यशोधक के. ओ. बावस्कर, डॉ. सुनिता खरडे, डॉ. श्रुतिका शेगोकार, मानसिंग पुरभे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे.
सायंकाळी ७ वाजता गांधी भवन येथे ‘परिवर्तनाचा वादळवारा’ हा सुप्रसिद्ध गायक मेघानंद जाधव यांचा प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दादासाहेब काटकर असतील.
प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी रमेश घेवंदे, अभियंता संतोषराव वानरे, ठाणेदार गजानन कांबळे, डॉ. राजेश उबरहंडे, आनंदराव दुतोंडे, पत्रकार अनिल म्हस्के, रणजितसिंग राजपूत, दामोधर बिडवे, कुणाल पैठणकर, डॉ. अशिष खासबागे, भागवतराव तांदळे उपस्थित राहणार आहेत.
या सर्व कार्यक्रमांना समाजबांधव व बहुजन समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब वानरे, कार्याध्यक्ष उमेश पुरभे, सचिव आत्माराम चांदोरे, कोषाध्यक्ष प्रा. डि. आर. माळी, संघटक सुरेश कांबळे, उपाध्यक्ष बबनराव परमेश्वर, इंजी. अशोकराव भोसले, सुभाषराव शेगोकार, प्रा. डॉ. गजानन चिम, देवलाल बडगे, संजय सुरडकर, तुळशिराम परमेश्वर, गिरीश सरसांडे, प्रा. के. ओ. शिंगणे, कैलास पसरटे यांनी केले आहे.

0 9 4 9 7 4
Users Today : 5
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *