अजितदादा म्हणजे एका रात्रीत नशीब बदलवणारा नेता मनोज कायंदे, श्याम मेहेत्रे यांना संधी; अ‍ॅड. नाझेर काझींवरही दाखवला विश्वास

Khozmaster
2 Min Read

सिंदखेड राजा प्रतिनिधी :

राजकारणात एखाद्याचे नशीब एका रात्रीत बदलण्याची ताकद जर कुणाकडे असेल, तर ती ताकद अजितदादा पवार यांच्याकडे आहे, असे पुन्हा एकदा दिसून आले आहे. आमदार मनोज कायंदे, श्याम मेहेत्रे यांना थेट संधी देत तसेच अ‍ॅड. नाझेर काझींना राज्यस्तरावर जबाबदारी सोपवून अजितदादांनी आपल्या दूरदृष्टीचे दर्शन घडविले आहे.
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात अनेक दिग्गज इच्छुक असतानाही अजितदादा पवार यांनी राजकीय गणिते बाजूला ठेवत तरुण नेतृत्वावर विश्वास दाखवला. जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते मनोज कायंदे यांना एका रात्रीत उमेदवारी देत त्यांच्या हातात घड्याळ बांधण्यात आले. ही संधी देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नाझेर काझी यांच्या शिफारशीला दादांनी मान दिला.
त्याचप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे विश्वासू नेतृत्व म्हणून ओळख असलेले अ‍ॅड. नाझेर काझी यांच्यावरही दादांनी मोठी जबाबदारी सोपवली. अल्पसंख्याक समाजाला पक्षाशी अधिक घट्टपणे जोडण्यासाठी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. जातीपातीच्या राजकारणापेक्षा कार्यक्षमतेला महत्त्व देणारा अजितदादांचा हा निर्णय मानला जात आहे.
सिंदखेडराजा नगरपालिकेतही अजितदादांनी आपला ठसा उमटवला. शरद पवार गटातून आलेले श्याम मेहेत्रे यांना आपल्या पक्षात सामावून घेत त्यांच्या हातात थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली. अनेक इच्छुक असतानाही नव्या नेतृत्वावर विश्वास दाखवून त्यांनी पुन्हा एकदा ‘एका रात्रीत नशीब बदलवणारा नेता’ ही ओळख सार्थ ठरवली.
विशेष म्हणजे विदर्भात सिंदखेडराजा हे अजितदादांचे आवडते केंद्र मानले जाते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून आजपर्यंत एखादा अपवाद वगळता येथील सत्ता सातत्याने अजितदादांच्या नेतृत्वाखाली राहिल्याचे चित्र आहे. त्यामुळेच सिंदखेडराजा हा अजित पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.

0 9 4 9 7 4
Users Today : 5
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *