मेहकर येथे पालिकेसह सर्वपक्षीयांकडून अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली

Khozmaster
2 Min Read

मेहकर प्रतिनिधी :
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. अजितदादा पवार यांना मेहकर नगरपालिकेच्या प्रांगणात नगरपालिका प्रशासन व सर्वपक्षीयांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी आयोजित शोकसभेत माजी आमदार डॉ. संजय रायमूलकर, बाजार समिती सभापती माधवराव जाधव, नगराध्यक्ष किशोर गारोळे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्याम उमाळकर, माजी नगराध्यक्ष हाजी कासम गवळी, तहसीलदार निलेश मडके, मुख्याधिकारी रामराजे कापरे, बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. अनंतराव वानखेडे, भीमशक्तीचे नेते कैलास सुखधाणे, विदर्भवादी नेते अॅड. सुरेशराव वानखेडे, उपनगराध्यक्ष मो. आलीम, शिवसेना गटनेते सुरेश वाळूकर, शहरप्रमुख जयचंद बाठिया, भाजपचे डॉ. सुभाष लोहिया, नगरसेविका डॉ. दीपिका रहाटे, शैलेश बावस्कर, प्रदीप देशमुख, सीताराम ठोकळ, वैशाली सावजी, वसंतराव देशमुख, अॅड. आकाश घोडे, समाधान साठे, विनायक टाले, विलास बचाटे, शंकर गायकवाड, स्वाती नवले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. राज्याच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान अविस्मरणीय असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गिरीधर पाटील ठाकरे यांनी केले, तर सूत्रसंचालन सिद्धेश्वर पवार व युनूस पटेल यांनी केले. आभारप्रदर्शन राजू नवले यांनी केले.
याप्रसंगी गजानन सावंत, विजय पवार, अनिल शर्मा, कलीम खान, निबांजी पांडव, सोपानराव देबाजे, सारंग माळेकर, सुमेर खान, जितु अडेलकर, विलास जुनघरे तसेच नगरसेवक विशाल काबरा, ओम सौभागे, मनोज जाधव, मंगेश गायकवाड, अक्काताई गायकवाड यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 9 4 9 7 4
Users Today : 5
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *