मातोश्री वृद्धाश्रमात तिळगूळ वाटप

Khozmaster
1 Min Read

अकोला प्रतिनिधी :

अकोला शहरातील खडकी येथील मातोश्री वृद्धाश्रमात मकरसंक्रांतीनिमित्त तिळगूळ वाटप व फराळाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमामुळे वृद्धांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. तसेच वाढत्या वृद्धांच्या संख्येबाबत उपस्थित मान्यवरांनी चिंता व्यक्त केली.
या कार्यक्रमास साहेबराव वहिले, कोकीळा धवस, संत ज्ञानेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष शशिकांत शिंदे, तुळशीराम बोबडे, गुणवंतराव जानोरकर, शिवहरी मराठे, विश्वास देशमुख, इंगोले, अरुणा टेकाडे, उषा चौधरी, प्रशांत वहिले, विश्वजीत वहिले आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांनी वृद्धांशी संवाद साधत त्यांच्या आरोग्याबाबत विचारपूस केली व सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन केले. अशा उपक्रमांमुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असून समाजाने त्यांच्याविषयी अधिक संवेदनशील राहण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

0 9 4 9 7 2
Users Today : 3
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *