देऊळगाव राजा प्रतिनिधी :
भरधाव आणि निष्काळजीपणे चालविण्यात आलेल्या कारने दुचाकीस जोरदार धडक दिल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि. २४) सायंकाळी देऊळगाव राजा–जालना मार्गावरील अशोक ढाब्यासमोर घडली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात चारचाकी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश रंगनाथ पाटोळे (वय ३८, रा. शिवाजीनगर, देऊळगाव राजा) हे आपल्या एमएच २१ एझेड १४४२ क्रमांकाच्या मोटारसायकलने जालना येथून घरी परतत होते. त्याचवेळी त्यांच्या दुचाकीच्या पाठीमागून येणाऱ्या एमएच २८ बीक्यू १९८१ क्रमांकाच्या कारचालकाने वाहन निष्काळजीपणे चालवत दुचाकीस जोरदार धडक दिली.
या अपघातात प्रकाश पाटोळे हे दुचाकीवरून रस्त्यावर कोसळले. त्यांना डोक्याला, हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत जखमीस उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
या घटनेप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून संबंधित कारचालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार ब्रह्मा गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गोरे हे करीत आहेत.
देऊळगाव राजा : भरधाव कारची दुचाकीस धडक; एक जण गंभीर जखमी
0
9
4
9
7
2
Users Today : 3
Leave a comment