बारामती प्रतिनिधी :
उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला असताना, बारामती येथे पार पडलेल्या राख सावडण्याच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे मौन उपस्थितांच्या मनाला अधिकच चटका लावून गेले.
या प्रसंगी शरद पवार यांनी कुठलेही भाष्य केले नाही, कुठलाही उद्गार काढला नाही. जड पावलांनी पुढे जात अस्थिकलशात राख अर्पण करताना त्यांचे शांत, थरथरते हात आणि निःशब्द उपस्थितीच त्यांच्या अंतःकरणातील दुःख व्यक्त करत होती.
राजकारणात शब्दांवर प्रभुत्व असलेले, अत्यंत कठीण प्रसंगातही संयम आणि तोल राखणारे शरद पवार या वेळी मात्र पूर्णपणे निःशब्द होते. त्या मौनात केवळ वैयक्तिक दुःख नव्हते, तर एका कुटुंबाने, एका नेतृत्वाने आणि संपूर्ण महाराष्ट्राने गमावलेल्या आधाराची जाणीव स्पष्टपणे जाणवत होती.
अजित पवार हे केवळ सहकारी किंवा पक्षातील महत्त्वाचे नेते नव्हते, तर शरद पवार यांच्या दीर्घ राजकीय वाटचालीतील एक मजबूत आधारस्तंभ होते. त्यांच्या निर्णयक्षमता, कामाचा वेग आणि आक्रमक प्रशासकीय शैलीमुळे त्यांनी राज्याच्या राजकारणात स्वतंत्र ओळख निर्माण केली होती.
राख अर्पण करताना शरद पवार यांचा चेहरा निर्विकार दिसत असला, तरी त्यांच्या डोळ्यांत दाटलेले दुःख लपवता येत नव्हते. शब्द न उच्चारताही व्यक्त झालेला तो शोक उपस्थित प्रत्येकाच्या मनाला भिडून गेला.
अजितदादांच्या राख सावडण्यावेळी शरद पवारांचे मौन अधिक बोलके ठरले कुठलीही प्रतिक्रिया नाही, कुठलेही भाष्य नाही; निःशब्द शोक व्यक्त
0
9
4
9
7
2
Users Today : 3
Leave a comment