कारंजा प्रतिनिधी :
कामरगावजवळील बेलखेड व पिंपळगाव शिवारात रानडुकराने अचानक हल्ला केल्याची घटना शुक्रवार (दि. ३० जानेवारी २०२६) रोजी सकाळी सुमारे ९ वाजता घडली. या हल्ल्यात पती-पत्नी गंभीर जखमी झाले असून, घटनेनंतर संपूर्ण बेलखेड गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण अंबादास मिरासे व रुंदा प्रवीण मिरासे (रा. बेलखेड) हे पती-पत्नी सकाळच्या सुमारास शेतात कामासाठी गेले असता, दबा धरून बसलेल्या रानडुकराने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात दोघांनाही शरीरावर गंभीर जखमा झाल्या.
हल्ल्यानंतर झालेल्या आरडाओरडीमुळे परिसरातील शेतकऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी दाम्पत्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, कामरगाव येथे दाखल केले. सध्या दोघांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
या घटनेनंतर बेलखेड व पिंपळगाव परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रानडुकरांचा वावर वाढल्याने शेतात जाणे धोकादायक बनले असून, वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
कारंजा : रानडुकराच्या हल्ल्यात पती-पत्नी गंभीर जखमी; परिसरात भीतीचे वातावरण
0
9
4
9
7
2
Users Today : 3
Leave a comment