बुलढाण्यात गणराज्य दिनानिमित्त कामगार कल्याण केंद्रात ध्वजारोहण व पुष्पहार समारंभ

Khozmaster
1 Min Read

बुलढाणा प्रतिनिधी :

२६ जानेवारी २०२६ रोजी स्थानिक कामगार कल्याण केंद्रात गणराज्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपनगराध्यक्ष गजेंद्र शालीग्राम दांदडे होते.
उपनगराध्यक्ष दांदडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कामगार कल्याण केंद्राकडून विद्या शिंदे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
कार्यक्रमात उपस्थित होते:
ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानाचे मधुसुदन कुलकर्णी, थोर समाजसुधारक ताराबाई शिंदे यांचे वंशज शोभाताई शिंदे, अशोक दामोरे, गजानन माने, गणेश राणे, अशोक बजाज, दिनकर तळणीकर, नंदकिशोर खत्री, आत्माराम गोसावी, अशोक अग्रवाल, विनायक खराटे, बबन गादे, पुडलिक मापारी, राजू उबरहंडे, अशोककुमार गणोरकर आदी.
उपनगराध्यक्ष दांदडे यांनी कामगार कल्याण मंडळाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची प्रशंसा केली तसेच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या आर्थिक योजनांचा लाभ कामगारांनी मोठ्या प्रमाणात घ्यावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलेश देशमुख यांनी केले, आभारप्रदर्शन विद्या शिंदे यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रमिला उबरहंडे यांनी परिश्रम घेतले.

0 9 4 9 7 2
Users Today : 3
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *