नांदुरा प्रतिनिधी (शुभम ढवळे) _भारतीय जनतेच्या आशा-आकांक्षांचे प्रतिक असलेले व भारताला सर्वश्रेष्ठ, सर्वोत्तम व सामर्थ्यशाली बनविण्याचे स्वप्न बघणारे व ते पूर्णत्वास नेण्यासाठी अथक व अविरत परिश्रम करणारे मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या निःस्वार्थी सेवाकार्यातून प्रेरणा घेऊन त्यांच्या ७२ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’या कार्यक्रमांतर्गत विविध सामाजिक व लोकोपयोगी उद्दिष्ट्ये साध्य करीत भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा मा. सौ. उमाताई खापरे,मा. जिल्हाध्यक्षा सौ. सिंधुताई खेडेकर,लोकनेते तथा माजी आमदार श्री चैनसुखजी संचेती, सामाजिक कार्यकर्ते तथा शहराध्यक्ष श्री श्यामभाऊ राखोंडे व नांदुरा शहर भाजपा सरचिटणीस श्री नितिनभाऊ लहाने यांच्या मार्गदर्शनात व ज्येष्ठ समाजसेविका तथा शहराध्यक्षा सौ. सारिकाताई डागा यांच्या संकल्पनेतुन नांदुरा शहर भाजपा महिला आघाडीच्या वतीने शहरात विविध समाजाभिमुख व कल्याणकारी उपक्रम राबविले गेले असून या उपक्रमांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना लाभ होऊन सकारात्मक परिवर्तन घडून आले. सामाजिक जाणिवांचा विस्तार करीत या कार्यक्रमांतर्गत पुढीलप्रमाणे विविध लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येऊन सेवा पंधरवडा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.__बालाजी मंदीर येथील हनुमान मूर्तीला जलाभिषेक करून सेवा सप्ताह कार्यक्रमाला प्रारंभ -__गतिशील, समर्पित व दृढनिश्चयी व्यक्तिमत्व मा. पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो या सद्भावनेतुन नांदुरा शहर व तालुका (ग्रामीण) भाजपा महिला मोर्चा व भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने शनिवार दि. १७/०९/२०२२रोजी नांदुरा शहरातील स्थानिक बालाजी मंदीर येथील हनुमान मूर्तीला जलाभिषेक करून सेवा सप्ताह कार्यक्रमाचा श्रीगणेशा* करण्यात आला._हनुमान चालिसा पठण व विविध आध्यात्मिक कार्यक्रम__ज्येष्ठ समाजसेविका तथा महिला शहराध्यक्षा सौ. सारिकाताई डागा यांच्या नेतृत्वात याच दिवशी शहरातील संत निरंकारी भवन येथे हनुमान चालिसा पठण व विविध आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मा. पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी किसान योजना, उज्ज्वला योजना, घरकुल योजना, मोफत राशन वाटप व स्वच्छता अभियान यांसारख्या लोकोपयोगी योजनांच्या माध्यमातून जी समाजाभिमुख कार्ये केली व त्याद्वारे देशाची विस्कटलेली घडी नीट बसविली यानिमित्ताने त्यांना कृतज्ञतापूर्वक पत्रे पाठविण्यात आली.__यावेळी श्री बंटीभाऊ फणसे, श्री उमेश भाऊ ताकवाले, गोपालभाऊ नालट, सागरभाऊ धामोडे, गणेशभाऊ राखोंडे, बजरंग दलचे सदस्य विशाल भाऊ धंगेकर, भाजपा महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा सौ. लताताई ठोंबरे, शहर महिला मोर्चा उपाध्यक्ष सौ जयश्रीताई पिंपरे, बेटी बचाव बेटी पढाव संयोजिका सौ. ज्योतीताई तांदळे, शहर महिला मोर्चा सोशल मीडिया संयोजिका सौ रेणू ताई डागा, लिलाबाई इंगळे, सुशीला ताई घन, रुखमाताई उगले, रेखाताई राखोंडे, , अक्षयभाऊ घन, दिलीपभाऊ यांच्यासह नांदुरा शहर व तालुका भाजपा, महिला मोर्चा व युवा मोर्चा यांचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एक दिवशीय सामाजिक सेवा’ कार्यक्रम__सेवा पंधरवडा कार्यक्रमाच्या अंतर्गत नांदुरा शहर भाजपा महिला आघाडीच्या वतीने ज्येष्ठ समाजसेविका तथा शहराध्यक्षा सौ. सारिकाताई डागा यांच्या कार्यक्षम नेतृत्वात एक दिवशीय सामाजिक उपक्रम या कार्यक्रमाचे यशस्वीपणे आयोजन बुधवार दि. 21/09/2022 रोजी शहरातील संत निरंकारी सत्संग भवन येथे करण्यात आले होते.__या कार्यक्रमाच्या अंतर्गत पुढील लोकोपयोगी व समाजाभिमुख उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले होते._विड लसीकरण बूस्टर डोस मोहिम -भावी काळात कोरोना पॉझिटिव्ह संख्या वाढल्यास पुन्हा निर्बंध लावण्याची वेळ येऊ नये व नागरिकांचे आरोग्य सुदृढ रहावे हा दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून नांदुरा शहर व पंचक्रोशीतील नागरिकांसाठी कोविड लसीकरण बुस्टर मोहिम आयोजित करून त्याअंतर्गत नागरिकांना बुस्टर डोस सेवा उपलब्ध करून देण्यात आली. या सेवेचा लाभ घेऊन अनेक नागरिकांनी आपल्या कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यास पुढाकार घेतला.
_मोफत ई-श्रमिक कार्ड शिबिर –
_नांदुरा शहरात आजही अनेक मजूर-कामगार अत्यंत हलाखीच्या परिस्थितीचा सामना करीत असून त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी या कार्यक्रमाच्या अंतर्गत मोफत ई-श्रमिक कार्ड शिबिर राबविण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून अनेक गरजूंना ई-श्रमिक कार्ड मोफत स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले.
मतदान – आधार जोडणी शिबिर -वडणूक आयोगाच्या दिलेल्या सुचनेनुसार नागरिकांना आधार क्रमांक मतदार यादीशी जोडणे बंधनकारक असून याच अनुषंगाने या एकदिवसीय सेवा कार्यक्रमांतर्गत मतदार-आधार शिबिर यशस्वीपणे राबविण्यातआले. या शिबिरामध्ये शहरातील अनेक नागरिकांनी सहभागी होऊन आधार क्रमांकाची मतदार यादीशी जोडणी करून घेतली._
_यावेळी माजी नगरसेवक श्री सुधीरभाऊ मुर्हेकर, भाजपा जेष्ठ नेते श्री मुकेशभाऊ डागा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्री बंटीभाऊ फणसे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्री राजेशभाऊ डागा, भाजपा नांदुरा शहर सचिव श्री ब्रह्मानंदभाऊ चौधरी, नांदुरा सोशल मीडिया संयोजक श्री सागरभाऊ धामोडे, बुथप्रमुख श्री गणेश भाऊ राखोंडे, बेटी बचाव बेटी पढाव संयोजिका सौ.ज्योतीताई तांदळे, भाजपा महिला मोर्चा उपाध्यक्ष सौ.जयश्रीताई पिंपरे, भाजपा महिला मोर्चा नांदुरा शहर संयोजिका सौ. रेणूताई डागा, सौ. पुजाताई राखोंडे, सौ. लिलाबाई इंगळे यांसह इतर सर्व भाजपा सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी महाराणा मंडळचे सर्व सदस्य त्यामध्ये श्री अक्षयदादा घन, स्वयंसेवक संघाचे श्री राहुलभाऊ राखोंडे, बंटीदादा, माही, बजरंग दलचे विशाल भाऊ धंगेकर आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी सेवाभावी योगदान दिल्याबद्दल नांदुरा शहर भाजपा महिला आघाडीच्या वतीने लसीकरण टीम नांदुरा व संत निरंकारी सत्संग भवन सदस्य मंडळ यांचे आभार मानण्यात आले._शालेय विद्यार्थ्यांना आवश्यक वस्तुंचे वाटप
Users Today : 39