पातूर येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, दुर्गा दौड संपन्न

Khozmaster
2 Min Read

 

प्रतिनिधी रामेश्वर वाढी

पातूर दि.०४ – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या वतीने पातूर शहरात सालाबादप्रमाणे दुर्गा दौडचे आयोजन करण्यात आले .दुर्गा दौडची सुरवात पातूरचे ग्रामदेवता संत श्री सिदाजी महाराज मंदीरातून भगव्या ध्वजाचे मंत्रोच्चारात पुजन करून करण्यात आली.महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी माता व छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष व श्लोकांचे पठण करीत दुर्गा दौड ही संत श्री सिदाजी महाराज मंदीरातून श्री विठ्ठल रूक्मिणी मंदीर,खडकेश्र्वर मंदीर, जगदंबा माता मंदीर, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते टेकडीवरील रेणुकामाता मंदीर पर्यंत काढण्यात आली.रेणुका माता मंदीर येथे संस्थानच्या वतीने दुर्गा दौडचे स्वागत व ध्वजाचे पुजन करण्यात आले.

दुर्गा दौडच्या ध्वजाचा मान शाळकरी मुलीला देत आदीशक्तींचे विविध रूपे असलेल्या स्री शक्ती जागर करीत अनेक लहान मुलींनी उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभाग नोंदविला.

यावेळी सहभागी सर्व लहान मुला मुलींना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना धारकरी विजय राऊत यांनी म्हटले की आजचे युग हे स्री शक्तीचे असून सुद्धा त्यांच्या वर वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार होत आहेत त्यांना स्वरक्षणाचे धडे देवून आत्मसन्मानार्थ आत्मनिर्भर करण्याची नितांत आवश्यकता आहे.व ते कार्य दुर्गा दौडच्या माध्यमातून पुढे नेण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी विजय राऊत,धारकरी सुहास देवकर, धारकरी प्रमोद श्रीनाथ,पै.सुरेश श्रीनाथ,डिगांबर फुलारी,राजू उगले,पै.मंगेश गाडगे,विनोद वडतकार,महेश बोचरे,विठ्ठल डिके,विलास हिरळकार,गणेश गाडगे,अलका राऊत,सिमा गाडगे,दुर्गा श्रीनाथ,काजल श्रीनाथ,मनिषा राऊत,स्वरा गाडगे,वैशाली गाडगे,निशा नाभरे,श्रावणी नाभरे,सानवी तायडे,हर्षा तायडे,श्रेया निलखन,खुषी उगले,कोमल सातपुते,रोहिणी गणेशे,दिव्या श्रीनाथ,वैष्णवी राऊत,चेतन राऊत,सार्थक गाडगे,ओम देवकर,वैशाली डोंगे,अंजली ठक, अंजली राऊत सह अनेक मुला मुलींनी दुर्गा दौड यशस्वी करण्यास परिश्रम घेतले.अशी माहिती दुर्गा दौड चे मार्गदर्शक पातूर तालुका विकास मंचाचे संयोजक ठाकूर शिवकुमारसिंह बायस यांनी यावेळी दिली.

0 9 4 7 5 0
Users Today : 39
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *