मुंब्रा येथील सोशल मीडिया इन्फ्ल्यूंसर Nadeem Khan यांच्या घराखाली झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या घटनेत दोन जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणाचा तपास Mumbra Police करत असून या हल्ल्यामागे Bishnoi Gang यांचा संबंध आहे का, याचाही तपास सुरू आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शहाबाज कुरेशी याच्यासह आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आरोपींनी एकूण पाच गोळ्या झाडल्या असून पोलिसांनी त्यांच्याकडून शस्त्र आणि चार मॅगझिन जप्त केले आहेत.
गोळीबार सुरू असताना प्रत्यक्षदर्शी नागरिक आणि पोलिसांनी जीवाची पर्वा न करता आरोपींना पकडण्यात मदत केली, अशी माहितीही समोर आली आहे.
दरम्यान, अटक करण्यात आलेला आरोपी शहाबाद उर्फ शंभू मुन्ना शमशाद कुरेशी हा मुंब्राचाच रहिवासी असून त्याच्यावर दिल्लीतील Jafrabad परिसरातील चार पोलीस ठाण्यांमध्ये विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यापूर्वी तो Tihar Jail येथे आठ वर्षांची शिक्षा भोगून बाहेर आला होता.
घटनेनंतर नदीम खान यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून आरोपींनी हा गोळीबार का केला, याचा तपास पोलीस करत आहेत.
Users Today : 29