सुलतानपूर येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; रक्तदान महायज्ञ उपक्रमानिमित्त कार्यक्रम

KHOZ MASTER
1 Min Read

Sultanpur :

वन बुलढाणा मिशनचे प्रेरक Sandeep Shelkhe यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या “रक्तदान महायज्ञ” उपक्रमाच्या निमित्ताने सुलतानपूर येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम विदर्भ कन्या Shaheen Patel यांच्या पुढाकाराने पार पडला.

यावेळी Zilla Parishad Marathi Primary Girls School Sultanpur येथे विद्यार्थ्यांना वह्या, पेन आणि चॉकलेटचे वाटप करण्यात आले. शिक्षणासाठी प्रेरणा देण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसून आला.

शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा इंगळे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत अशा शैक्षणिक सहकार्यामुळे विद्यार्थ्यांचे मनोबल वाढते, समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींकडून सकारात्मक प्रेरणा मिळते आणि शिक्षणाबद्दल आवड निर्माण होते, असे मत व्यक्त केले.

यावेळी शिक्षक अशोक शेजुळ यांनी संदीपदादा शेळके यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत त्यांनी निःस्वार्थ भावनेने समाजासाठी केलेल्या कार्यामुळे गोरगरिबांच्या मुलांना मोठी मदत होत असल्याचे सांगितले. तसेच शाळेच्या वतीने संदीपदादा शेळके यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत शाहीन पटेल यांच्या उपक्रमाचेही कौतुक करण्यात आले.

विदर्भ कन्या शाहीन पटेल यांनी आपल्या भाषणात संदीपदादा शेळके यांच्या समाजकार्याचा आढावा घेत “रक्तदान महायज्ञ” या उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी विजया विश्वनाथ आद्रट मॅडम, दिलीप वाघ, मनोज घुले यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करत शिक्षण, सेवा आणि माणुसकीचा संदेश देणारा हा कार्यक्रम आनंदमय वातावरणात पार पडला.

0 9 4 0 5 8
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *