वरखेड फाट्यावर भीषण अपघात; ट्रक आदळल्याने चालक-क्लीनर ठार, आठ शेळ्याही दगावल्या

KHOZ MASTER
2 Min Read

Khamgaon :

Varakhed Khurd फाट्याजवळ National Highway 53 वर भरधाव ट्रकने आयशरला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ट्रक चालक क्लीनरचा जागीच मृत्यू झाला. तसेच आयशरमधील आठ शेळ्यांचाही मृत्यू झाला. ही दुर्घटना शुक्रवारी पहाटे सुमारे साडेपाच वाजता घडली. 🚨

मिळालेल्या माहितीनुसार, Insaf Kayum Qureshi (वय ३७, रा. विजयपूर, मध्य प्रदेश) हे आपल्या ताब्यातील आयशर गाडी (क्रमांक RJ-11-GD-3796) मध्ये Surat येथील मंडीतून शेळ्या भरून Bhokar येथे जात होते. पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांचे वाहन वरखेड खुर्द फाट्याजवळ आले असता पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने (क्रमांक RJ-32-GD-2373) आयशरला जोरदार धडक दिली.

या अपघातात ट्रकची केबिन पूर्णपणे चुराडा झाली. त्यामध्ये ट्रक चालक Iqbal Ali Khan (वय २८, रा. अलवर, राजस्थान) आणि ट्रकमधील क्लीनर Mosam Khan Ashru Khan यांचा जागीच मृत्यू झाला. धडकेमुळे आयशरमधील आठ शेळ्यांचाही मृत्यू झाला. 🐐

काही काळ वाहतूक ठप्प

अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. 🚚

या प्रकरणी इन्साफ कुरेशी यांच्या तक्रारीवरून खामगाव शहर पोलिसांनी आरोपी चालक इकबाल अली खान याच्याविरुद्ध Bharatiya Nyaya Sanhita कलम १०६(१), २८१, १२५ (अ)(ब), ३२४(४), ३२५ तसेच Motor Vehicles Act 1988 कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी गोरे करीत आहेत.

0 9 4 0 5 9
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *