“समृद्ध शेतकरी” बनविण्यासाठी “पाणी फाउंडेशन” ने उचले महत्वाचे पाऊल…अविनाश राठोड

KHOZ MASTER
1 Min Read

मंठा*

तालुक्यातील पंचायत समिती उमेद आणि कृषी विभागाच्या सहकार्याने श्रीराम बाग पर्यटन केंद्र,परभणी येथून सत्यमेव जयते फार्मर कप प्रशिक्षणातून 55 शेतकरी प्रशिक्षण घेऊन आले आहे.
गटशेतीतून शेतकऱ्यांना कर्ज बाजारीपणातून समृद्धीकडे कसे नेता येईल,उत्तम दर्जाची गट शेती कशी करावी?कमी खर्चात शेती करून उत्पन्नात वाढ कशी करता येईल? स्मार्ट शेतकरी कसा व्हावा?
त्याच प्रमाणे स्पर्धेत कसे उतरावे इ. कामाचा सखोल ज्ञान या प्रशिक्षणात मिळाले.प्रशिक्षणातून आल्यानंतर समृद्ध किंवा स्मार्ट शेतकरी बनवण्यासाठी पाणी फाउंडेशन चे कार्य उत्तम असल्याचे प्रसार माध्यमासी बोलताना अविनाश राठोड यांनी सांगितले आहे.गटशेतीतून अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात,विविध एस.ओ.पी च्या माध्यमातून उत्पन्नात वाढ,गटशेतीच्या माध्यमातून शाश्वत शेती करून पिकाच्या उत्पादनाचा खर्च कमी करणे व उत्पादकता वाढविण्यासाठी ई.अधिक माहिती सुद्धा या प्रशिक्षणात मिळाली आहे.
आपण पंचायत समिती उमेद,कृषी आणि पाणी फाउंडेशन च्या अधिकाऱ्यांशी संप्रेषण साधून गटबांधणी,गट शेती आणि फार्मर कप स्पर्धेत भाग घेण्यासाठी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणार असल्याचे राठोड यांनी सांगितले आहे.आपण गट शेती करताना लिंबोळी अर्क,दशपर्णी अर्क आणि जैविक खताचा वापर जास्त प्रमाणात करणार आहोत.फार्मर कप स्पर्धेत उतरण्यासाठी आपण स्मार्ट शेती ॲप वापर आणि मूल्यांकन पद्धतीनुसार बांधणी करणार असल्याचे राठोड यांनी शेवटी सांगितले.
मंठा तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी गट तयार करून फार्मर कप स्पर्धेत भाग नोंदवावा आणि स्पर्धेच्या बक्षिसासाठी उत्तमरीत्या तयारी करावी
असे आवाहन राठोड यांनी केले आहे.

0 9 4 0 6 9
Users Today : 1
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *