नागपूर प्रतिनिधी :
वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पक्ष्यांसाठी पाणी व दाण्याची सोय करण्यासाठी Orange City College of Social Work येथे यावर्षीही ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’ हा उपक्रम राबविण्यात आला.
मार्च महिन्यातच प्रखर उन्हाचा कहर वाढत असल्याने पक्ष्यांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी अडचण निर्माण होते. या पार्श्वभूमीवर संविधान जागर आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी महाविद्यालयात दरवर्षी हा उपक्रम आयोजित केला जातो.
संस्थेचे अध्यक्ष Dr Kedarsingh Rotele यांच्या मार्गदर्शनात आणि प्राचार्य Dr Mahendrakumar Meshram यांच्या नेतृत्वात हा उपक्रम पार पडला. महाविद्यालयाच्या स्मृतिशेष डॉ. चंदनसिंह रोटेले शैक्षणिक परिसरातील गार्डनमध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी झाडांच्या सावलीत मातीच्या भांड्यात पक्ष्यांसाठी पिण्याचे पाणी व दाण्यांची व्यवस्था केली.
या उपक्रमामुळे परिसरातील अनेक शाळा व महाविद्यालये प्रेरित होऊन आपल्या परिसरातही पक्ष्यांसाठी दाणापाण्याची सोय करण्यास पुढे आली आहेत.
उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सतीश भराडे, राजेंद्र झोड, गोकुल आष्टनकर, शारदा गिरी, मालती तुपे, अनिता चतुर, धीरज रोटेले आणि सदाशिव गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले
Users Today : 3