नागपूर प्रतिनिधी :
Academy of Medical Sciences Nagpur (एएमएस) यांच्या वतीने आयोजित दोन दिवसीय वार्षिक वैद्यकीय परिषदेत आधुनिक वैद्यकशास्त्रातील महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा व मंथन करण्यात आले.
तज्ज्ञांच्या मते, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होणारे आनुवांशिक आजार तसेच जन्मजात व्याधी असलेल्या बालकांचे वेळेवर निदान आणि उपचार आधुनिक वैद्यकशास्त्रामुळे शक्य होत आहेत. तसेच दीर्घकालीन औषधोपचारांमुळे शरीरावर होणाऱ्या संभाव्य दुष्परिणामांचे प्रभावी व्यवस्थापनही करता येते, असे या परिषदेत स्पष्ट करण्यात आले.
परिषदेच्या पहिल्या दिवशी Indian Medical Association हाऊस, अंबाझरी रोड येथील डॉ. एम. टी. पैठणकर हॉलमध्ये संशोधन निबंध सादरीकरणाचे सत्र आयोजित करण्यात आले. औषधशास्त्र, शल्यक्रिया, नेत्ररोग, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र, कान-नाक-घसा, न्यूरोलॉजी आणि प्लास्टिक सर्जरी या विविध शाखांतील १८ शोधनिबंध सादर करण्यात आले.
या सत्राचे परीक्षक म्हणून Dr Radha Munje, Dr Kush Jhunjhunwala आणि Dr Divish Saxena यांनी काम पाहिले. सत्राचे संयोजन Dr Archana Deshpande यांनी केले.
संशोधन सादरीकरणात Dr Pankaj Dwivedi यांना प्रथम, तर Dr Nitin Lohia यांना द्वितीय पारितोषिक देण्यात आले. तसेच उत्कृष्ट केस पेपर सादरीकरणासाठी Dr Rajesh Mundada यांचा सन्मान करण्यात आला.
पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांचा गौरव
परिषदेत प्रोफेशनल एक्सलेन्स पुरस्काराने ज्येष्ठ मेंदूविकारतज्ज्ञ Dr Chandrashekhar Meshram यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या कार्याचा परिचय ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ Dr Sudhir Bhave यांनी करून दिला. तसेच यंग अचिव्हर पुरस्काराने मूत्रपिंडविकारतज्ज्ञ Dr Vishal Ramteke यांना सन्मानित करण्यात आले.
दुसऱ्या दिवशी Centre Point Hotel येथे विविध वैद्यकीय विषयांवरील शैक्षणिक सत्रांचे आयोजन करण्यात आले. या सत्रात Dr Abhishek Fave, Dr Pankaj Harkut, Dr Pramod Giri आणि Dr Vikram Wagh यांनी मार्गदर्शन केले.
प्रतिष्ठेच्या डॉ. वहाडपांडे स्मृती व्याख्यानात Dr Mukund Thatte यांनी ‘मानवी हाताच्या अंगठ्याची उत्क्रांती आणि त्याची पुनर्रचना’ या विषयावर माहितीपूर्ण सादरीकरण केले.
एएमएसचे अध्यक्ष Dr Nainesh Patel, परिषद अध्यक्ष Dr Shivnarayan Acharya, पुरस्कार समिती अध्यक्ष Dr Raju Khandelwal, कोषाध्यक्ष Dr Archana Deshpande आणि मानद सचिव Dr Sameer Jahagirdar यांच्या नेतृत्वाखाली ही परिषद यशस्वीरीत्या पार पडली. समारोप डॉ. समीर जहागीरदार यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.
Users Today : 3