LPG सिलेंडरमध्ये किती गॅस उरलाय? ‘ओल्या कपड्याचा’ देशी जुगाड व्हायरल

KHOZ MASTER
1 Min Read

मुंबई, दि. १६घरगुती LPG Cylinderमधील गॅस किती उरला आहे, हे ओळखण्यासाठीचा एक देशी जुगाड’ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

Instagramवरील @salve_6717 या हँडलवरून शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये, ओल्या कपड्याच्या मदतीने सिलेंडरमधील गॅसची पातळी ओळखता येते, असा दावा करण्यात आला आहे.

कसा आहे हा जुगाड?

व्हिडिओनुसार,

  • सर्वप्रथम सिलेंडर ओल्या कपड्याने पूर्ण पुसून घ्यायचा

  • त्यानंतर २-मिनिटे थांबायचे

  • ज्या भागात गॅस आहे तो भाग ओलसर राहतो, तर गॅस नसलेला भाग लवकर सुकतो

  • यावरून सिलेंडरमध्ये गॅसची पातळी अंदाजे समजू शकते

युजर्सच्या गंमतीशीर प्रतिक्रिया

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

  • गॅस कळो ना कळो, सिलेंडर तरी स्वच्छ होतो!”

  • माझी आई तर सिलेंडर उचलूनच सांगते!”

  • दिवसभर पुसलं, पण काहीच समजलं नाही!”

तज्ज्ञांचा इशारा

तज्ज्ञांच्या मते, ही पद्धत वैज्ञानिकदृष्ट्या पूर्णपणे प्रमाणित नाही. तापमान, हवामान आणि सिलेंडरची स्थिती यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या जुगाडावर पूर्णपणे अवलंबून राहणे योग्य नाही, असे सांगितले जात आहे.

0 9 4 1 8 0
Users Today : 16
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *