जिल्हास्तर क्रीडा निपुणता केंद्रासाठी खेळाडू निवड चाचणी ५ एप्रिलला

KHOZ MASTER
1 Min Read

बुलढाणा 

जिल्ह्यात जिल्हास्तरीय क्रीडा निपुणता केंद्र सुरू करण्याच्या दृष्टीने खेळाडू निवड चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे. वेटलिफ्टिंग व मैदानी क्रीडा प्रकारांसाठी ही निवड चाचणी ५ एप्रिल २०२६ रोजी जिल्हा क्रीडा संकुल, बुलढाणा येथे होणार आहे.
Directorate of Sports and Youth Services Maharashtra, पुणे यांच्या माध्यमातून Mission Lakshyavedh Yojana ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत जिल्हा क्रीडा संकुल, बुलढाणा येथे वेटलिफ्टिंग व मैदानी क्रीडा प्रकारांसाठी क्रीडा निपुणता केंद्र स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे.
या केंद्रात निवड झालेल्या खेळाडूंना निवासी स्वरूपात दर्जेदार क्रीडा प्रशिक्षण, आवश्यक क्रीडा साहित्य, अल्पोपहार तसेच क्रीडा विज्ञान विषयक सहाय्य शासन मान्यतेनुसार उपलब्ध करून दिले जाणार आहे.
जिल्ह्यातील गुणवंत खेळाडूंना प्रगत प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे. इच्छुक व पात्र खेळाडूंनी निर्धारित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह १ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

0 9 4 5 6 1
Users Today : 26
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *