अ. भा. अंनिसच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी रामेश्वर तायडे यांची निवड

KHOZ MASTER
1 Min Read

बुलढाणा –

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) ची जिल्हास्तरीय बैठक मराठा सेवा संघ कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हा कार्यकारिणीचे पुनर्गठन करण्यात आले असून रामेश्वर तायडे यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.

बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी अंनिसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुरेश झुमरे, राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे, नागपूर जिल्हाध्यक्ष सुनील वंजारी तसेच विदर्भ संपर्क प्रमुख सुधीर आंडे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून मार्गदर्शन केले.

या बैठकीत जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. त्यानुसार जिल्हा संघटक प्रमोद टाले, जिल्हाध्यक्ष डॉ. मनोहर तुपकर, जिल्हा कार्याध्यक्ष रामेश्वर तायडे, उपाध्यक्ष स्वाती सावजी, जिल्हा सचिव आशिष गवई, सहसचिव विवेक हिवाळे, कोषाध्यक्ष भिमसेन शिराळे, युवा संपर्क प्रमुख सुमेध जाधव, महिला संपर्क प्रमुख प्रतिभा भुतेकर, डिजिटल मीडिया प्रमुख गिरीश शिरसांडे यांची निवड करण्यात आली.

तसेच जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून सर्जेराव देशमुख, आत्माराम चांदोरे, करुणा घोडेस्वार, अंजली गाढे, उत्तमराव बाजड यांचा समावेश करण्यात आला. सल्लागार सदस्य म्हणून डॉ. अशोकराव खरात, प्रा. सुनील सपकाळ, दत्ता सिरसाट, डॉ. विजय चोपडे, किशोर वाघ, चित्रांगण खंडारे, प्रविण पहूरकर, रघुनाथ कौलकर आणि अभय मारोडे यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

यावेळी सर्पमित्र श्रीराम रसाळ, वर्षा गवई यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद टाले यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रतिभा भुतेकर यांनी केले.

0 9 4 5 6 0
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *