बुलढाणा
राज्यात केरोसिन वितरणाचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन असताना केरोसिन परवान्यांचे सुलभतेने नूतनीकरण व मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे स्वागत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष रखमाजी राऊत यांनी केले आहे.
महाराष्ट्रभर केरोसिन विक्रेत्यांचे परवाने थांबवून चिल्लर केरोसिन विक्री बंद केल्यामुळे पारंपरिक विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली होती. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी लायसन्सधारक विक्रेत्यांचे परवाने तत्काळ नूतनीकरण करून त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी करण्यात आली होती.
या संदर्भात काही दिवसांपूर्वीच रखमाजी राऊत यांनीही शासनाकडे मागणी करत केरोसिन विक्रेत्यांचे परवाने तातडीने नूतनीकरण करण्याची गरज व्यक्त केली होती. त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने त्यांनी माध्यम प्रतिनिधी तसेच शासनाचे आभार मानले आहेत.
राऊत यांनी सांगितले की, नियमांनुसार केरोसिन विक्रीसाठी अधिकृत परवाना आवश्यक असताना पेट्रोल पंपांना केरोसिन वाटपाचा अधिकार देणे योग्य नाही. या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी रिटेल आणि होलसेल केरोसिन विक्रेत्यांनाच परवाने देण्यात यावेत, तसेच पारंपरिक विक्रेत्यांचे परवाने तातडीने नूतनीकरण करावे, अशीही मागणी त्यांनी शासनाकडे केली होती.
Users Today : 25