राज्यांची विविधता लक्षात घेऊन शेतीचे धोरण आखणे आवश्यक : डॉ. करमसिंग राजपूत

KHOZ MASTER
1 Min Read

संग्रामपूर 

देशात तयार होणारी धोरणे खरोखरच शेतीला पूरक आहेत का, असा प्रश्न उपस्थित करत शेतीसंबंधीचे धोरण हे राज्यांची भौगोलिक व सामाजिक विविधता लक्षात घेऊन आखणे अत्यंत आवश्यक आहे, असे मत डॉ. करमसिंग राजपूत यांनी व्यक्त केले.

वरवट बकाल येथील कला व वाणिज्य महाविद्यालय वरवट बकाल येथे स्व. प्रा. भास्कर ढाले स्मृतीप्रीत्यर्थ “भारतीय शेतीचे बदलते स्वरूप : कारणे आणि उपाययोजना” या विषयावर राज्यस्तरीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मार्गदर्शन करत होते.

या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीराम येरणकर होते, तर उद्घाटक म्हणून विदर्भ अर्थशास्त्र परिषदचे अध्यक्ष डॉ. राजेश चव्हाण उपस्थित होते.

तसेच प्रमुख अतिथी म्हणून डॉ. संजय कोठारी, डॉ. गिरीश मायी आणि डॉ. सुभाष गुर्जर यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक डॉ. सुभाष गुर्जर यांनी केले.

या परिसंवादाचे आयोजन महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभाग आणि विदर्भ अर्थशास्त्र परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ. सतीष राणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. नागेश इंगळे यांनी केले.

या परिसंवादाला महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका तसेच अर्थशास्त्र विभागातील पदव्युत्तर विद्यार्थी आणि विविध शाखांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 9 4 5 6 1
Users Today : 26
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *