‘खडकपूर्णा’तर्फे किनगाव राजात जलजागृती सप्ताह

KHOZ MASTER
1 Min Read

किनगाव राजा

किनगाव राजा येथील ग्रामपंचायत कार्यालयात जलसंधारणाबाबत जनजागृती करण्यासाठी जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या सप्ताहादरम्यान सिंचनतज्ज्ञ शंकर निलकंठवार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना पाण्याच्या योग्य नियोजनाबाबत मार्गदर्शन केले.

जलसंपदा विभाग महाराष्ट्र तसेच विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, बुलढाणा पाटबंधारे मंडळ आणि देऊळगाव राजा येथील खडकपूर्णा प्रकल्प विभागाच्या वतीने हा जलजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे.

यावेळी जलसंपदा विभागाच्या स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पल्लवी सरासे यांनी भविष्यात पाण्याचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी पाण्याचा व जलस्रोतांचा वापर योग्य पद्धतीने करावा, असे आवाहन केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रकाश मुंढे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू मांटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिवानंद मुंढे यांनी मानले.

यावेळी सतीश राजे, नंदकिशोर मांटे, प्रा. भगवान कायंदे, राजू राजे आणि गजानन कासतोडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 9 4 5 6 0
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *