सातपुडा स्ट्रायकर्स संघ ठरला संत सावता माळी प्रिमियर लीगचा विजेता खिलाडीवृत्तीने प्रत्येक स्पर्धा व्हाव्यात : राहुल बोंद्रे

KHOZ MASTER
2 Min Read

चिखली

क्रीडा स्पर्धांमुळे युवकांमध्ये शिस्त, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण विकसित होतात. तसेच अशा स्पर्धांमुळे स्थानिक खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची मोठी संधी मिळते. खेळाडूंनी स्वच्छ, निष्पक्ष आणि प्रामाणिक खेळ करत क्रीडाभावना जपली पाहिजे. खेळात कोणत्याही प्रकारचे राजकारण येऊ देऊ नये आणि प्रत्येक स्पर्धा खिलाडीवृत्तीनेच पार पडावी, असे प्रतिपादन राहुल बोंद्रे यांनी केले.

चिखली येथे आयोजित संत सावता माळी प्रिमियर लीग-२०२६ च्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते.

२१ मार्च रोजी पार पडलेल्या अंतिम सामन्यात डॉ. शैलेश भराड यांच्या सातपुडा स्ट्रायकर्स संघाने उत्कृष्ट खेळ करत विजेतेपद पटकावले. तर स्वप्नील खरात यांच्या नेतृत्वाखालील कार डेकोर संघाने दमदार कामगिरी करत उपविजेतेपद मिळवले.

विजेत्या व उपविजेत्या संघांना आकर्षक पारितोषिके, ट्रॉफी आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्रथम पारितोषिक म्हणून योगेश भाऊ जाधव यांच्या वतीने २१ हजार रुपये, तर द्वितीय पारितोषिक म्हणून दीपक देशमाने यांच्या वतीने ११ हजार रुपये देण्यात आले.

याशिवाय उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर आणि उदयोन्मुख खेळाडूंनाही विशेष पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाला स्वाती वाकेकर, दीपक खरात, गोपाल डेव्हडे, प्रकाश सपकाळ, प्रशांत भटकर, विजय जागृत, अॅड. विलास नन्हई, विलास घोलप, अनिल जैवाळ, डॉ. अमोल लहाने, राम बनसोडे, भारत खरात, सुभाष खरात, देविदास सुरुशे, बंडू खरात, रत्नदीप शिनगारे, डॉ. शिवशंकर खेडेकर, मनोज लाहुडकर, सूचित भराड यांच्यासह चिखलीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन अॅड. विलास नन्हई आणि दीपक खरात यांनी केले.

0 9 4 5 6 0
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *