देऊळगावची ज्योती पाटोळे जळगाव पोलीस दलात मातंग समाज बांधवांच्या वतीने सत्कार

KHOZ MASTER
1 Min Read

देऊळगाव राजा 

मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कृषी उत्पन्न बाजार समितीत हमाली करणाऱ्या वडिलांची मुलगी पोलीस दलात भरती झाली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल देऊळगाव राजा येथील मातंग समाज बांधवांच्या वतीने ज्योती पाटोळे हिचा सत्कार करण्यात आला.

ज्योतीचे वडील शेषराव पाटोळे हे येथील देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये हमालीचे काम करतात. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही त्यांनी स्वतःच्या कष्टावर मुलांच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले.

आई-वडिलांचे कष्ट पाहून ज्योतीने स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. तिने MPSC तसेच पोलीस भरतीसाठी अभ्यास आणि सराव सातत्याने सुरू ठेवला. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात तिने यश मिळवत जळगाव पोलीस दलात महिला पोलीस शिपाई म्हणून निवड मिळवली.

देऊळगाव राजा तालुक्यातून मातंग समाजातील पोलीस दलात भरती होणारी ज्योती पाटोळे ही पहिली मुलगी ठरली असून तिच्या यशामुळे समाजात नवचैतन्य निर्माण झाले आहे.

स्थानिक विश्रांतीगृहात आयोजित कार्यक्रमात मातंग समाजाच्या वतीने ज्योती पाटोळे व तिच्या आई-वडिलांचा पेढे भरवून सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. दिलीप अर्जुने होते. यावेळी प्रल्हाद देशमुख, राजू गोफणे, संतोष जाधव, टी. टी. साबळे, प्रभाकर धोंगडे, बाळू निकाळजे, सुनिल लोखंडे, देवानंद धोंगडे, भगवान खंदारे, अभिषेक नामवाड, राजू नाडे, मंगल अंभोरे, गजानन पाटोळे, विकास तौर, राजू पाटोळे, प्रविण हांडे, किशोर साळवे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 9 4 6 3 0
Users Today : 44
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *