थकबाकी वसुलीसाठी महावितरणचा कडक पवित्रा साखरखेर्डा केंद्रांतर्गत ४.६५ कोटी रुपयांची थकबाकी

KHOZ MASTER
2 Min Read

किनगाव राजा 

महावितरण च्या सिंदखेडराजा उपविभागांतर्गत साखरखेर्डा वितरण केंद्रामध्ये वीज बिल थकबाकीचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. घरगुती व वाणिज्यिक मिळून सुमारे ३५०० ग्राहकांकडे तब्बल ४.६५ कोटी रुपयांची थकबाकी प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे.

या वाढत्या थकबाकीच्या पार्श्वभूमीवर महावितरणने कडक भूमिका घेतली असून थकबाकीदारांविरुद्ध वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे.

मार्च २०२६ अखेरीस वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत असून अधिकारी व कर्मचारी पातळीवर व्यापक हालचाली सुरू आहेत. २१ मार्च रोजी मेहकर विभागाचे कार्यकारी अभियंता अनिरुद्ध आलेगावकर यांनी स्वतः साखरखेर्डा व सवडत या गावांना भेट देऊन मोहिमेचा आढावा घेतला. त्यांनी थकबाकीदार ग्राहकांशी थेट संवाद साधत वीज बिल तात्काळ भरण्याचे आवाहन केले.

त्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीमुळे स्थानिक स्तरावर वसुली मोहिमेला अधिक गती मिळाल्याचे दिसून आले. सिंदखेडराजा उपविभागात थकबाकी ही गंभीर समस्या बनली असून कोणत्याही परिस्थितीत थकीत बिलांची वसुली करण्याचे स्पष्ट निर्देश कार्यकारी अभियंता आलेगावकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

महावितरणकडून ग्राहकांना वेळेत वीज बिल भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. थकबाकीदारांनी तत्काळ थकबाकी भरून सहकार्य करावे, अन्यथा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, एका ग्राहकाकडे एकापेक्षा अधिक वीज जोडण्या असल्यास आणि त्यापैकी एखाद्या जोडणीचे बिल थकले असल्यास, नियमांनुसार त्या ग्राहकाच्या इतर सर्व जोडण्या — जरी त्यांची बिले भरलेली असली तरी — खंडित केल्या जाऊ शकतात. त्यामुळे कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी सर्व बिले वेळेत भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या वसुली मोहिमेत कार्यकारी अभियंता अनिरुद्ध आलेगावकर यांच्यासह सहाय्यक अभियंता विलास सवडतकर, शाखा अभियंता रोहित पाटील तसेच लाईनमन व कर्मचारी यांनी कडक उन्हात साखरखेर्डा व परिसरातील ग्रामीण भागात घरोघरी जाऊन वसुलीचा धडाका सुरू केला आहे.

0 9 4 6 4 0
Users Today : 54
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *