पोलिसांच्या अवैध धंद्यावर धाडी सुरूच पाच आरोपींकडून १ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

KHOZ MASTER
2 Min Read

नांदुरा

नांदुरा येथे अवैध धंद्यांविरोधात पोलिसांचे धाडसत्र सुरूच असून २१ मार्च रोजी करण्यात आलेल्या कारवायांमध्ये पाच आरोपींकडून सुमारे १ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांना सोनज रोड परिसरातील सार्वजनिक ठिकाणी पैशांच्या हारजीतवर ‘एक्का बादशहा’ नावाचा जुगार खेळला जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाड टाकली.

या कारवाईत आरोपी अब्दुल तौसीफ अब्दुल मुजीब (वय ३२, रा. कचेरीपुरा, नांदुरा) याच्या ताब्यातून ७५० रुपये रोख आणि पांढऱ्या रंगाची एसएस-१२५ सीसी बिना नंबरची दुचाकी (किंमत सुमारे ६० हजार रुपये) जप्त करण्यात आली.

तसेच इलियास कयुम (वय ३४, रा. कचेरीपुरा, नांदुरा) याच्याकडून ८०० रुपये रोख व एचएफ डिलक्स दुचाकी (किंमत सुमारे ९० हजार रुपये) जप्त करण्यात आली.

याशिवाय मोहम्मद वसीम मोहम्मद जमील (वय ३६, रा. ताज नगर, नांदुरा) याच्या ताब्यातून १ हजार रुपये रोख, पल्सर दुचाकी (किंमत ३५ हजार रुपये), डावावरचे ७५० रुपये आणि ५२ पत्त्यांचा एक तासपत्ता (किंमत ५० रुपये) असा एकूण १ लाख ८८ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दरम्यान, शहरातील घास मंडी परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत सुभाष सुपडा इंगळे (वय ४५, रा. गांधी चौक, नांदुरा) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून १,०२० रुपये रोख व एक डॉट पेन असा एकूण १,०२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तसेच सुभाष चौक येथे करण्यात आलेल्या कारवाईत सुमारे १,५३० रुपयांची अवैध दारू जप्त करण्यात आली.

या कारवाईदरम्यान आरोपी तुकाराम भिवटे हा फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. सर्व आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास नांदुरा पोलीस करीत आहेत.

0 9 4 5 6 0
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *