सात हजार रुपये लंपास करणाऱ्या दोघांना पोलिसांनी दोन तासात पकडले

KHOZ MASTER
1 Min Read

मोताळा

मोताळा येथे २० मार्च रोजी घडलेल्या चोरीच्या घटनेत ७ हजार रुपये लंपास करणाऱ्या दोघा आरोपींना पोलिसांनी अवघ्या दोन तासांत अटक केली आहे. या कारवाईमुळे चोरट्यांपेक्षा पोलिसांचे नेटवर्क अधिक प्रभावी असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले.

ही घटना बुलढाणा-मलकापूर रोडवरील बाबा पेट्रोल पंप समोर, चिंचपुर शिवारात २० मार्च रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली.

नांदुरा तालुक्यातील खडदगाव येथील मंगेश सुनिल घोगले हे एमएच-१९-ईआर-२२९२ क्रमांकाच्या दुचाकीवरून जात असताना दोन अज्ञात आरोपींनी संगनमत करून त्यांच्या खिश्यातील ७ हजार रुपये लंपास केले.

या प्रकरणी बोराखेडी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे सिताराम मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र कपले, नंदकिशोर धांडे, कपिश काशपाग आणि ज्ञानेश्वर धामोडे यांनी तांत्रिक तपास करत दोन आरोपींना अवघ्या दोन तासांत अटक केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शंकर श्रीराम चव्हाण (वय १८, रा. मोताळा) आणि अमजद शाह कदर शाह (रा. बिस्मिल्ला नगर, जामनेर; सध्या मुक्काम मोताळा) यांचा समावेश आहे.

या जलद कारवाईमुळे पोलिसांचे जाळे किती मजबूत आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

0 9 4 5 6 0
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *