योगेश नागोलकार पातुर महाराष्ट्रामध्ये जगत जननी जगदंबा मातेचे साडेतीन शक्तीपीठह.भ.प.जयश्रीताई खोंड यांचे प्रतिपादन तालुक्यातील राहेर येथे श्री.नवयुवक दुर्गा उत्सव मंडळा समोर आयोजित करण्यात आलेल्या एक दिवशीय नवरात्रनिमित्त भव्य असा किर्तन महोत्सव बाल किर्तनकार हरी भक्ती पारायण जयश्रीताई गोपाल खोंड उमरा पांगरा यांच्या वानीतून संपन झाला यावेळी जयश्रीताई बोलत होत्या की या महाराष्ट्रामध्ये जगत जननी जगदंबा मातेचे साडेतीन शक्तीपीठ आहेत ते आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. शक्तीपीठाच्या पिठाच्या बाबतीत विचार केला तर साडेतीन शक्तीपीठ आपल्या महाराष्ट्र मध्ये आहेत.51 शक्तिपीठ आपल्या भारत देशामध्ये आहेत. आणि 108 शक्तीपीठ या जगाच्या पाठीवर आहेत. शक्तिपीठाचे निर्मिती कशी झाली.पार्वती मातीच्या देहाची तुकडे झाले ते तुकडे एकूण 108 झाले 51 तुकडे आपल्या भारत देशामध्ये पडले त्या ठिकाणी 51 शक्तीपीठ निर्माण झाले ज्या शरीराची मुक्ती साडेतीन भाग या महाराष्ट्रामध्ये पडले या ठिकाणी साडेतीन शक्तीपीठ निर्माण झाली महालक्ष्मी कोल्हापूरला तुळजाभवानी तुळजापूरला रेणुका माता माहुर गडावर आणि सप्तशृंगी माता वणीच्या गडावर हे अर्ध पिठ आहे. थोडक्यात सांगते की 108 शक्तीपीठे जगाच्या पाठीवर आहेत ज्या वेळेला दक्ष प्रजापती आणि या दक्ष प्रजापतीची सर्वांग मोठी असणारी मुलगी ती म्हणजे माता पार्वती ही माता पार्वती जगत जननी जगदंबा मातीचा साक्षात तिचा अवतार होता सती असं तिचं नाव होतं सती आणि पार्वती एकच जेव्हा सतीही मोठी झाली तेव्हा दक्षाला असं वाटायला लागलं या वेळी त्या बोलत होत्या.किर्तनाला गावातील नागरिकांनी व बाहेर गावातून नागरिकांनी चांगलीच हजेरी लावली होती.
Users Today : 39