अकोला – जिल्ह्यात 3 बालगृहे व 1 शिशुगृह कार्यरत असून बालकल्याण समितीच्या आदेशाने यामध्ये प्रवेश दिला जातो. आधारकार्ड हे सर्व योजनांकरीता आवश्यक असून बालगृहातील बालकांसाठी आधारकार्ड शिबीर दि.1 रोजी आयोजित करण्यात आले. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, जिल्हा परीविक्षा अधिकारी गिरीश पुसदकर, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी राजू लाडूरकर, आधारकार्डचे जिल्हा व्यवस्थापक प्रमोद ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आधारकार्ड नोंदणी शिबीर संपन्न झाले. या शिबीरात शिशुगृहातील 12 शिशू व शासकीय बालगृहातील 3 बालकांची नवीन आधारकार्ड नोंदणी करण्यात आली. शिबीर यशस्वी करण्याकरीता सुनिल लाडूलकर, प्रविण क्षीरसागर, रोहीत इंगळे, प्रफुल सावणे यांनी प्रयत्न केले.