चिखली शहरात दिनांक 5 /10 2022 रोजी दसऱ्याच्या दिवशी जयस्तंभ चौक येथे महात्मा राजा रावण यांना रिपब्लिकन सेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. हजारो वर्षापासून मनुवाद्यांनी बहुजन समाज अन्याय व त्यांच्या महान राजांना राक्षस म्हणून हिणवले त्यांच्या संपन्न राज्यावर डोळा ठेवून साम दाम दंड भेद चा वापर करून राज्य हस्तगत केले, वर्ण भेद जाती भेदच्या चक्रव्यूहात अडकवून मूलनिवासी बहुजन समाजाला देशोधडीला लावले, ज्या बळीराजाच्या राज्यात शेतकरी कष्टकरी सगळेच गुण्या गोविंदाने नांदत होते अश्या राजाचे राज्य हिसकावून घेतले, सतत मूलनिवासी बहुजनांवर अन्याय करणारे हजारो वर्षानंतर आजही विद्वान , सर्वगुण संपन्न, महात्मा रावणाचे दहन करुन वर्णव्यवस्थेतील बहुजनांचा अपमान करीत आहेत, ज्या महान राजाकडून आपण राज्यकारभार शिकलो अश्या राजाला दरवर्षी अनिष्ट रूढी परंपरेच्या नावावर द्वेष भावनेतून दहन करणे कितपत योग्य आहे, अकोला जिल्ह्यातील पातूर जवळ सांगोला येथे दसऱ्याच्या दिवशी महात्मा रावणाची पूजा होते इतकेच काय तर भारतात काकीनाडा आंध्र प्रदेश , कोलार (कर्नाटक), मध्य प्रदेशातील मंदसौर , (बिसरख-उत्तर प्रदेशातील नोएडा क्षेत्र) बैजनाथ मंदिर, हिमाचल प्रदेश – चांदपोल, (जोधपूर-राजस्थान), रावणग्राम , मध्य प्रदेश – मंदसौर (मध्य प्रदेश) विदिशा जिल्ह्यातले एक गाव (मध्य प्रदेश)शिवनगरी (कांगडा- हिमाचल प्रदेश)-शिवाला (कानपूर-उत्तर प्रदेश) : कानपूरच्या दशानन मंदिरात हजारो लोक रावणाची पूजा करतात. शहराच्या शिवाला भागात बांधलेल्या शिव मंदिराला लागूनच रावणाचे मंदिर आहे. रावणाच्या ज्ञानाचा आदर केला होता. त्यामुळे या मंदिरात रावणाची पूजा होतेज्या महात्मा रावणाची भारतात कित्तेक ठिकाणी मंदिरे उभारून त्यांची मनोभावे पूजा केल्या जाते अश्या महात्माचे दहन करणे त्यांचा अपमान करणे रिपब्लिकन सेना कदापी सहन करणार नाही अश्या घटना घडल्या तर रिपब्लिकन सेना त्यांच्यावर गुन्हे दाखल केल्या शिवाय राहणार नाही,हजारो वर्षापासून चालत आलेली दसऱ्याच्या दिवशी रावण दहन सारखी अनिष्ट प्रथा मोडीत काढत आज रिपब्लिकन सेनेच्या वतीने चिखली शहरात जयस्थंभ चौक येथे महात्मा रावणाच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्यांना मोठ मोठ्या घोषणा देऊन अभिवादन करण्यात आले, रिपब्लिकन सेनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष भाई विजयकांत गवई, बुलढाणा जिल्हा महासचिव सलीमभाई, जिल्हा उपाध्यक्ष ब्रम्हाभाऊ साळवे, यांनी महात्मा यांना पुष्प व हार घालून अभिवादन केले. कार्यक्रमावेळी बुलढाणा जिल्हा प्रसिद्ध प्रमुख शेख मुक्तार, वाशिम भाई, रमेशभाऊ अंभोरे, अन्सारभाई, शेख मालिक, प्रदीपभाऊ हिवाळे, सतीश पवार, विश्वनाथ सपकाळ, ऋषिकेश हिवाळे, सतीश इंगळे, अप्पू खान, जावेदभाई, दीपक तायडे, सौरभ बावस्कर, सिद्धू माघाडे, सचिन ससाने, श्याम बशिरे, शेख दानिश, स्वराज शिसागर, देवाभाई शिसागर, विकी निकाळजे, विकास गायकवाड, जय नवले, विकीभाऊ आणि रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.