वडाळी सटवाई माता यात्रा महोत्सव संपन्न

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी विशाल गवई अकोट आपलं भाग्य आणि भविष्य सटवाई ने लिहिले असे समजले जाते. तशी श्रद्धाही आहे बाळाच्या जन्माच्या पाचव्या दिवशी सटवाई बाळाच भाग्य भविष्य लिहिते असा पुरातन काळापासून चा समज आहे. त्यामुळे सटवाई ही आदि माईचं रूपही समजले जाते. असंच अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील वडाळी हे गाव. ह्या गावच्या सुपीक शेतीमुळे गावाचं नाव जिल्ह्याच्या परिचयाच. पण या गावाला एका मातृदेवतेनं गावातच नाही तर राज्यभरात प्रसिद्धी दिली आहे. म्हणून या गावाचं नाव ही वडाळी सटवाई अस आहे. त्या अनुषंगाने वडाळी सटवाई येथे भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये कीर्तनाचा कार्यक्रम सुद्धा करण्यात आला होता.त्यामध्ये 16 क्विंटल गव्हाचा महाप्रसाद करण्यात आला होता. त्यामध्ये हजारो भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी अध्यक्ष प्रकाश गडम. सुरेश रेळे. पुरुषोत्तम रेळे. दिलीप गडम. अनंता गडम . दादाराव ढोबळे. धनंजय गडम. शरद रेळे. प्रमोद गडम. विलास गडम. प्रदीप गडम.गावकरी मंडळी उपस्थित होते

0 9 4 7 5 0
Users Today : 39
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *