पातूर येथे एका शेतात मृतदेह आढळल्याने खळबळ मृत्यूचे कारण गुलदस्त्यात

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी रामेश्वर वाढी पातूर : शहरातील 22 एकर ले-आऊट नजिक असलेल्या शेतात इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली.            दि.04 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 4:00 वाजताच्या सुमारास पातूर शहरातील गुरुवार पेठ येथील रहिवासी अरविंद बंड यांचे शेतात त्यांचा भाचा अजय इंगळे आला असता शेतातील विहिरीजवळ एक इसम मृतावस्थेत पडून असल्याचे निदर्शनास आले असता त्याने सामाजिक कार्यकर्ते सचिन बारोकार यांना कळविले.बारोकार यांनी घटनेची पातूर पोलिसांना माहिती दिली.सदर इसम हा इकबाल शहा महमूद शहा (वय अंदाजे 45) रा.महमूद नगर, पातूर येथील असून आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.       यावेळी सचिन बारोकार,किरण निमकंडे,स्वप्निल सुरवाडे,रणजित गाडेकर,आरिफ शहा,महबूब शहा तस्लिम शहा,शेख शाहरुख यांनी मृतदेह शेताबाहेर उचलून नेण्यास मदत केली.दरम्यान पातूर पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक मीरा सोनुने, पो.हे.कॉ.भास्कर इंगळे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मर्ग दाखल केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता सर्वोपचार रुग्णालय, अकोला येथे पाठविला असून पुढील तपास पातूर पोलीस करीत आहेत.

0 9 4 7 5 0
Users Today : 39
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *