चिखली मध्यप्रदेषच्या सिमेवर साधला आदिवाषी बांधवासोबत सवांद चिखली: 05 ऑक्टांेबर 2022कॉग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारतजोडो यात्रा नोव्हेंबर मध्ये तिस-या आठवडयात बुलडाणा जिल्हयात येत असुन ज्या मार्गावरून ही यात्रा जाणार आहे, त्या मार्गाची जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांच्यासह पदाधिका-यांनी काही दिवसांपूर्वी पाहणी केली होती.
या मार्गावरील पुर्व तयारीची पाहणी कॉग्रेस विधीमंडळ पक्षनेते मा.आ. बाळासाहेब थोरात यांनी मा.आ. यषोमतीजी ठाकुर, मा.आ. नितीनजी राउत, प्रदेष कॉग्रेस कार्यध्यक्ष मा.आ. कुणाबाबा पाटील, मा.आषिषजी दुवा, मा.आ.राहुलजी बोंद्रे, मा.आ. राजेष एकडे, मा.आ. हर्षवर्धन सपकाळ, मा.विजय अंभोरे, मा.आ.दिलीपकुमार सानंदा, मा.श्यामभाउ उमाळकर, मा. संजय राठोड, मा.आ. मोहनदादा जोषी, श्रीमती सोनल पटेल, मा.अभिजीत सपकाळ, सचिन गुंजाळ यांच्यासह राज्य व राष्ट्रीय पातळीवरील दिग्गज नेत्यांनी आज केली.खासदार राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात सुरू असलेली भारतजोडो यात्रा ही देष हितासाठी असुन सदर यात्रेचा बुलडाणा जिल्हयात 4 दिवस मुक्काम राहणार आहे. आंध्रप्रदेष, तेलंगणा, या राज्यातील यात्रेनंतर महाराष्ट्रात आगमन होईल. तसेच भारतजोडो यात्रेची पहिली सभा नांदेड येथे होणार असुन दुसरी मोठी सभा जळगांव जामोद येथे होणार आहे. शेगांव व संग्रामपुर भागातील, महाराष्ट्र व मध्यप्रदेष सिमेवरील पाहणी केल्याची माहिती मा.बाळासाहेब थोरात यांनी दिली. नोव्हेंबरच्या तिस-या आठवडयात बुलडाणा जिल्हयात आगमन होणारी ही यात्रा खामगांव, शेगांव, नांदुरा, जळगांव जामोद, संग्रामपुर, या संभाव्य ठिकाणावरून जाणार आहे. या यात्रेच्या पूर्व तयारीची पाहणी करण्यासाठी कॉग्रेसच्या दिग्गज नेत्यांचे एक षिष्टमंडळ बुलडाणा जिल्हयात आले होते. त्या अगोदर दि. 29 व 30 सप्टेंबर ला मा.प्रातांध्यक्ष नानाभाउ पटोले यांनी दोन दिवस मुक्कामी राहुन जिल्हा कॉग्रेसच्या विविध सेल, फ्रटंल व जिल्हयातील महत्वाच्या पदाधिका-या सोबत आढावा बैठकी घेतल्या.राज्यातील ईडी सरकार निवडक उद्योजकांच्या फायदयासाठी आदिवासी जमीनी, खाजगी वन जमीनी, हरित पट्टे, खारफुटीचे जंगले, यांचा बळी देत असुन आधिच कमी होत असलेला महाराष्ट्रातील हरित पट्टा राज्यातील सरकार कमी करत आहे. या पार्ष्वभुमीवर मध्यप्रदेष सिमेवरील आदिवासी बांधवांसोबत बाळासाहेब थोरात यांनी संवाद साधला. यावेळी जल, जमीन, जंगल कुणरीन छे, अमरीन छे, अमरीन छे, अमु अक्का एक छे, दिल को दिल से कोन जोडेगा, हम जोडेगे, हम जोडेगे, नफरत छोडो भारत जोडो, राहुल गांधी जिंदाबाद या व अषा प्रकारच्या आदिवासी बांधवांच्या घोषणांनी परिसर दणानून गेला होता. जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली भारतजोडो यात्रेची स्थानिक पदाधिका-यांनी जयत तयारी सुरू केली आहे. मागिल 5 आठवडयांपासुन बैठकीचे सत्र सुरू असुन जिल्हयातील पदाधिका-यांना कामाची जबाबदारी सोपविली आहे. मा.बाळासाहेब थोरात यांच्यासह पदाधिका-यांनी सर्व मुक्कांच्या स्थळाची पाहणी केली. त्यानंतर जिल्हा दौ-यावर आलेल्या कॉग्रेस नेत्यांना जिल्हाध्यक्ष राहुलभाउ बांेद्रे यांनी स्थळ पाहणीच्या माध्यमातुन माहीती दिली. यावेळी प्रदेष सचिव डॉ.स्वातीताई वाकेकर, ज्ञानेष्वर दादा पाटील, रामविजय बुरूंगले, धनंजय देषमुख, जाहेदअल्ली खान, जेष्ठ नेते लक्ष्मणराव घुमरे, प्रकाष पाटील, संतोष आंबेकर, तेजेंद्रसिंह चौव्हाण, अविनाष उमरकर, राजेंद्र वानखेडे, किरणबापु देषमुख, विजय काटोले, शैलेंद्र पाटील, दिपक सलामपुरीया, प्रकाष देषमुख, तेजराव मारोडे,अॅड. भालेराव, अर्जुन घोलप, अमोल घोडेस्वार, जुबेर पटेल, संतोष राजनकर, संजय ढगे, श्याम डाबरे, पंकज हाजारी, मनोहर बोराखेडे, मोहन रौदंळे, अख्तर मोरे, मिनाताई सातव, प्रमोद पाटील, बुढन जमादार, शेख अफरोज, अजय ताठे, सचिन हरमकार, शेख राजीद, शेख जलील, यांची उपस्थिीती होती.
Users Today : 54