मुर्तिजापुर (भुषण महाजन) :– दरवर्षी दसऱ्याला रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. यादिवशी रावण वध म्हणजेच सत्याचा असत्यावर विजय, अज्ञानावर ज्ञानाचा विजय असल्याचे प्रतिक मानले जाते. प्रभू श्रीरामाने लंका नरेश रावणाचा पराभव करून त्याच्या कैदेतून सितामाईची सुटका केली होती. म्हणून दसऱ्याच्या दिवशी रावण दहन केले जाते.

सार्वजनिक दसरा मोहत्सव समिती, मुर्तिजापुर च्या आयोजकाकडून यावर्षी रावण दहनाकरिता मोठया थाटामाटामध्ये राम-लक्षमण, सिता व हनुमान यांची मिरवणूक वाजत-गाजत काढण्यात आली. आठवडी बाजारातील मैदानावर मिरवणूक पोहचल्यानंतर नेहमीप्रमाणे रावण दहन करण्यात आले.
सार्वजनिक दसरा मोहत्सव समिती, मुर्तिजापुर कडून साजरा होणाऱ्या रावण दहनाला मुर्तिजापुर विधानसभाचे आ. हरीषभाऊ पिंपळे, माजी नगराध्यक्ष व्दारकाप्रसाद दुबे, नगरसेवक विनायक गुल्हाणे, समाजसेवक कैलास महाजन, कमलाकर गावंडे, गुलाब दुबे, ज्ञानेश्वर गुल्हाणे, सर्पमित्र मुन्ना श्रीवास या मान्यवरां बरोरच नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

Users Today : 56