आठवडी बाजाराची साफसफाई रोजच करण्यात यावी

Khozmaster
1 Min Read

मुर्तिजापुर (भुषण महाजन) – दरवर्षी दसऱ्याला रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. यादिवशी रावण वध म्हणजेच सत्याचा असत्यावर विजय, अज्ञानावर ज्ञानाचा विजय असल्याचे प्रतिक मानले जाते. प्रभू श्रीरामाने लंका नरेश रावणाचा पराभव करून त्याच्या कैदेतून सितामाईची सुटका केली होती. म्हणून दसऱ्याच्या दिवशी रावण दहन केले जाते.

दरवर्षीप्रमाणे दसऱ्याच्या दिवशी शहरातील आठवडी बाजारातील मैदानामध्ये  रावण दहन केल्या जाते. या मैदानाची गेल्या पाच सात दिवसापासून साफसफाई करणे सुरू होते. या मैदानामध्ये संपूर्ण तालुक्यामधून व बाहेरगावावरुन येणाऱ्या भाज्यांचा रोज सकाळी लिलाव होतो. तसेच शुक्रवार रोजी बाजार भरत असल्यामुळे या मैदानामध्ये रोजच कचरा राहतो. तसे पाहता वर्षातून एकदा साजरा होत असलेला रावण दहन कार्यक्रमाकरिता व यदा-कदाचित जर एखादी सभा अथवा काही कार्यक्रम असला तरच अशाप्रकारची साफसफाई केल्या जाते. रावन दहन कार्यक्रमाकरिता करण्यात आलेल्या मैदानाची तथा आजबाजूच्या परिसरातील साफसफाई ही रोज करण्यात यावी. जेणेकरुन रोज भरत असलेल्या भाजी मंडी व तेथे लिलाव झाल्यानंतर होणाऱ्या कचऱ्याच्या प्रमाणामध्ये व त्यामुळे होणाऱ्या त्रासापासून भाजी विक्रेत्यांची मुक्तता होईल. असे भाजी विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

0 9 4 5 5 4
Users Today : 19
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *