श्रीकांत पाटील नांदुरा :– नांदुरा येथे दि.4 नंबर ऑक्टोंबर 2022 रोजी66 वा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नांदुरा रेल्वे स्टेशन येथे सदधम्म प्रबोधन आणि विपश्यना प्रशिक्षण सेवा ट्रस्ट लोणवाडी (धरण) रजि,723 यांच्यावतीने भव्यभोजनदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, आपल्या परिसरातील सर्व बौद्ध उपासक/उपासिका हे नागपूरला दरवर्षीप्रमाणे दीक्षाभूमीला वंदन करण्याकरिता जात असतात त्यांच्या सोयीसाठी आम्ही भोजनदान व पाणी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,हजारोंच्या संख्येने दीक्षाभूमीला जाणारी भीम अनुयायी यांना नांदुरा रेल्वे स्टेशन येथे अन्नदान करण्यात आले, या कार्यक्रमाला उपस्थिती, भदंत स्वरानंदजी थेरो बुलढाणा, भदंत संघपालजी नांदुरा ट्रस्टचे अध्यक्ष संतोष भीमराव तायडे, सचिव किशोर इंगळे, नियोजन समितीचे अध्यक्ष समाधान हेलोडे, सहसचिव राजेश इंगळे, बांधकाम समितीचे अध्यक्ष दिनकर वाकोडे, पेंटर विनोद चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते अजय भिडे, संतोष तायडे पत्रकार,अमर पाटील पत्रकार पुरुषोत्तम भातुरकर पत्रकार, यांच्या उपस्थितीमध्ये भोजनदनाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला होता,
Users Today : 39